महिलांचे मोबाईल हिसकावणारे सराईत युनीट-४ च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या सराईतांना व चार गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ९ मोबाइल संच आणि दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अर्जून राजेंद्र भंडारे (१९, सणसवाडी ता. शिरूर), योगेश राजेंद्र रासकर (१९, शिक्षक भवन तळेगाव ढमढेरे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील अर्जून भंडारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चाकण, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावर दुचाकीवरील सह प्रवासी महिलेच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली होती.

याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता त्यावेळी भंडारे, रासकर आणि त्यांचा साथीदार पुरुषोत्तम सिंह पुण्यात येऊन महिलांकडील मोबाइल संच हिसकावण्याचे गुन्हे करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे सहायक पोलीस फौजदार अब्दुल करीम सय्यद व पोलीस नाईक सचिन ढवळे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिघांचा शोध घेत सुरु असताना भंडारे आणि रासकर यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जबरी चोरीचे दोन गुन्हे आणि वाहन चोरीचा एक गुन्हा उघड करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून ९ मोबाईल व एक यामहा एफ झेड दुचाकी जप्त केली आहे. ज्यांचे मोबाइल हिसकावण्यात आले आहेत. अशा नागरिकांनी खडकीतील रेंजहिल्स येथे गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त ज्योती प्रिया सिंह, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक अश्विनी जगताप, अब्दुल करीम सय्यद, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, गणेश साळुंके, शीतल शिंदे, रमेश राठोड, अतुल मेंगे, हनुमंच बोराटे, गणेश काळे यांच्या पथकाने केली.