Coronavirus Lockdown : आपत्तीच्या काळात सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा मदतीचा हात

जेजुरी (संदीप झगडे) : सासवड-पंचायत समिती पुरंदर शिक्षण विभागाच्या वतीने समाजातील बेघर,निराधार,व इतर गरजू व्यक्तींना मदत व्हावी यासाठी शिक्षण विभागपुरंदर तर्फे कोवीड-१९ या संकटाशी सामना करताना तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी सामाजिक बांधिलकेतून मदत करावी असे आवाहन पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी श्री.गायकवाड यांनी केले होते.

या आवाहनास प्रतिसाद देत पुरंदर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना सासवड यांच्यावतीने पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात मदत केली.ही रक्कम पुरंदर तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोकअण्णा टिळेकर, सचिव धनंजय कुलकर्णी, आनंदराव जगताप, कल्याणराव ताकवले,जगन्‍नाथ झगडे, रा.ना.मेमाणे, तु.रा.मेमाणे, प्रकाश मेमाणे, बाजीराव गायकवाड यांनी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने कोरोना संकटाच्या मदतनिधीसाठी २५,०००/- (पंचवीसहजार रुपये) इतकी भरघोस मदत उस्फूर्तपणे देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.या शिल्लक निधीतून आरोग्य व अन्य विभागाच्या अत्यावश्यक साधनांची उपलब्धता करुन देणार आहोत. वेळोवेळी संकट काळात मदतीचा हात देण्यासाठी सेवानिवृत्त संघटना कायमच पुढे येत असते.आताही कोरोना विरुध्दच्या लढाईत आपण पाठीमागे नाहीत हे समाजाला दाखवून दिलेले आहे.

सेवानिवृत्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासन दक्ष राहून पाठपुरावा करू असे विचार पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मा.मोहनराव गायकवाड यांनी व्यक्त केले. अल्पावधीतच गटशिक्षणाधिकरी मोहन गायकवाड यांनी कोरोना संकटात तालुक्यातील सर्व शिक्षकांना सोबत घेऊन गरजूंना मदतीसाठी प्रयत्न चालवलेले पाहून निश्चितच समाधान वाटले. त्यामधूनच प्रेरणा घेवून आम्ही मदतीचा निर्णय घेतला.असे विचार सेवानिवृत्त संघटनेचे नेते रा ना मेमाणे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी गटसमन्वयक संजय चव्हाण केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, नंदकुमार चव्हाण,संतोष बोरकर भरत जगदाळे, मनोज राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.