पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमध्ये अनेक नागरीकांचा रोजगार गेलेला आहे. मागील काही दिवसांपासून जनजीवन पूर्ववत होत असले तरी मोलमजूरी करणारी कुटुंबे रोजगाराच्या शोधात आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा संकटप्रसंगी आधार देत सहकार्य करून सावरण्याचे काम केले पाहिजे, असे मत पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या संकटात मदत नव्हे, कर्तव्य या सामाजिक उपक्रमाअंतर्गत केशवनगर येथील गरजू कुटुंबांना यशोत्तम जनहित प्रतिष्ठानच्या वतीने मोफत किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले. डेटा ब्रिज मार्केट रिसर्च प्रा.लि यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे, उमेश गवळी, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना युवक अध्यक्ष रवी राणा पवार, सुखदेव गायकवाड, दिलिप भंडारी, अनिल भांडवलकर, संगीता पारधे, वैशाली खुणे, गौरी मूर्ती, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन वाबळे उपस्थित होते.