अन् ट्रेन रावणाला धडकली……

अमृतसर : पोलीसनामा ऑनलाईन – दसरा एक पावण पर्व…रामाने रावणाचा वध याच दिवशी केला. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो. आपली सगळी कामे उरकून दसऱ्याच्या संध्याकाळी लोक रावण दहन बघण्यासाठी जातात. यावेळी आलेल्या प्रेषकांचे मनोरंजन करण्यासाठी रामलीलाचे आयोजन करण्यात येते.मात्र अमृतसरमध्ये ऐन उत्सव सुरु असताना अनेक लोकांवर रेल्वे अपघाताने घाला घातला. त्यात रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पंजाबमधील अमृतसरमध्ये दसऱ्याला एक भीषण अपघात झाला. त्यात रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला. रावण दहनावेळी रावणाची भूमिका साकारणारा दलबीर सिंह हा देखील रुळावर उपस्थित होता. ज्यावेळी रावणाचा पुतळा जळत होता, त्यावेळी रामलीलामध्ये रावण बनलेला दलबीर सिंह रुळावरच उभा होता. रावण दहनाच्या वेळी भरधाव वेगाने ट्रेन आली आणि तिने दलबीरसह अनेकांना उडवलं. यात 61 जणांचा मृत्यू झाला तर 70 लोक जखमी आहेत.

ट्रेन दुर्घटनेचे राजकारण नको : नवज्योतसिंग सिद्धू

दलबीरच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. दलबीर आता या जगात नाही यावर पत्नी, आई आणि भावाला विश्वास बसत नाही. दलबीर अनेक वर्षांपासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. राम आणि लक्ष्मणला तयार करायचं आहे असं सांगून तो काल घराबाहेर पडला होता. रावण दहनाच्या दिवशीच रावण बनलेल्या दलबीर मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.

या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दलबीरच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी लोकांना सूचना दिली आहे आणि त्यामुळेच हा अपघात झाला.

बीड लोकसभा मतदारसंघात DM विरुद्ध PM लढत होणार !

कसा झाला अपघात ? –

जोडा फाटक परिसरात रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.