2 वर्षात सुमारे 2000 मुस्लिमांना दिलं भारतीय ‘नागरिकत्व’ : निर्मला सितारमण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या काही भागात नागरिकता सुधारण कायद्याच्या (CAA) विरोध दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१६ ते २०१८ दरम्यान भारताने सुमारे दोन हजार मुस्लिमांना नागरिकत्व दिले असल्याचे सांगितले आहे. चेन्नई येथील एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या कि, या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे कि, सीएए लागू केल्यासंदर्भात आमच्यावर होणारे भेदभावाचे सर्व आरोप चुकीचे आहेत. तसेच भारताने २०१६ ते २०१८ दरम्यान अफगाणिस्तानमधील ३९१, पाकिस्तानमधील १५९५ मुस्लिमांना नागरिकत्व दिले. यात अदनान सानी आणि तसलीमा नसरीन सारख्या लोकांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

तामिळ निर्वासितांनाही नागरिकत्व :
सीतारामन यांनी नागरिकत्वाविषयी अनेक आकडेवारी उघड केली. त्या म्हणाल्या कि, ‘गेल्या 6 वर्षात हजारो निर्वासितांना नागरिकत्व देण्यात आले आहे, ज्यात पाकिस्तानमधील २८३८, अफगाणिस्तानमधील ९१४, बांग्लादेशातील १७२ जणांचा समावेश आहे. यात बऱ्याच मुस्लिम समाजाचा सहभाग आहे. या व्यतिरिक्त भारताने १९६४ ते २००८ दरम्यान ४ लाख तामिळ निर्वासितांनाही नागरिकत्व दिले. त्या म्हणाल्या कि, या कायद्याचे उद्दीष्ट लोकांचे जीवन सुधारणे आहे. सरकार कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेत नाही, तर नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.

अमित शहा यांचे राहुल गांधींना आव्हान :
दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) कोणत्याही भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेईल हे सिद्ध करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आव्हान दिले. त्याचवेळी त्यांनी गांधींना हा कायदा पूर्ण वाचण्याचा सल्ला दिला. सीएएला ‘दलितविरोधी’ म्हणत विरोधकांचे वर्णन करताना शहा यांनी कॉंग्रेसवर धर्माच्या आधारे देशाचे विभाजन आणि अल्पसंख्याक समाजात संभ्रम निर्माण करण्याचा आरोप केला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याच्या विरोधात त्यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढविला आणि ते म्हणाले की, राहुल गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या दोघांनीही सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला असून हा कायदा लागू होऊ नये असे म्हंटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like