Video : आझाद हिंद सेनेच्या सदस्य राहिलेल्या सासुला सूनेकडून बेदम मारहाण ; व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘असे’ उत्‍तर

हरियाणा : वृत्तसंस्था –  सोशल मीडियावर एका महिलेकडून तिच्या म्हाताऱ्या सासूला वाईट पद्धतीने मारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला एका म्हताऱ्या बाईला अत्यंत वाईट पद्धतीने मारताना दिसून येत आहे.

सांगितले जात आहे की, व्हायरल होणारा हा व्हिडीओ हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्याच्या निवाज नगर गावातील आहे. सोशलमिडीयावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियानंतर पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची केस दाखल केली आहे.

पीडित महिला आझाद हिंद सेनेची सदस्य?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव कांता असे आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या बातमीतून असं कळते आहे की, ज्या म्हताऱ्या महिलेला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली असून ती आझाद हिंद सेनेची सदस्य राहिली आहे. ट्विटर युजर ऋषी बागरी यांनी शुक्रवारी व्हिडीओ शेअर करून लिहिले की, हा व्हिडीओ त्यांच्या शेजाऱ्याने बनवला आहे. आरोपी असणारी महिला रोज तिच्या सासूला अशा पद्धतीने मारहाण करते.

ट्विटर युजर ऋषी बागरी यांनी लिहिले की, पीडित महिला आझाद हिंद सेनेची सदस्य आहे. महिलेला आझाद हिंद सेनेची सदस्य असल्यामुळे महिना ३०,००० रुपये पेन्शनदेखील मिळते. या ट्विटमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना टॅग केले आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांनी हे ट्विट रिट्विट करून लिहिले की, हे दुःखदायक आणि निंदनीय आहे. सभ्य समाजात अशा प्रकारची वागणूक सहन करायला नाही पाहिजे. खटला दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपीला पकडण्यात आले आहे. पीडित महिला आझाद हिंद सेनेची सदस्य आहे की नाही याबाबत मुख्यमंत्री खट्टर यांनी ट्विटमध्ये कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.