राम शिंदे Vs रोहित पवार, कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीनमध्ये उदयनराजे ‘बरसले’, म्हणाले…

अहमदनगर : (कर्जत) पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार उदयनराजे भोसले कर्जत-जामखेड मतदारसंघातील राशीन येथे यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना उदयनराजे भोसले म्हणाले की , ‘तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरेचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते. त्यांचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ध्येय होते. त्यानंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने हे काम १५ वर्षे बंद पाडले. केवळ घोषणाच त्यांनी केल्या. कृष्णा खोरेचा प्रकल्प बंद पाडला. पैसा मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. हा पैसा कुठे गेला? अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी कधी जनतेचा विचार केला नाही. दुष्काळी भागाला पाणी देता येईल का? बेरोजगारांना रोजगार देता येईल का? याचा विचार त्यांनी केला नाही. यामुळे राष्ट्रवादीवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे.

राम शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले. फक्त जनतेच्याच प्रश्नाचा विचार केला. त्यामुळे याही वेळेस त्यांना निवडून द्या असे आवाहन उदयनराजे यांनी यावेळी केले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी