मोठी घोषणा ! देशातील 10 बँकांचे विलीनीकरण : अर्थमंत्री निर्मला सितारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, सरकारी बँकांमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी 10 राष्ट्रियीकृत बँकाच्या विलीनीकरणाची माहिती देत पंजाब नॅशनल बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचे विलनीकरण केल्याची घोषणा केली. या बँकांच्या विलनीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी दुसरी बँक असेल. तसेच यांचा व्यवसाय जवळपास 17.95 लाख कोटी रुपयांचा असणार आहे.

यासह इतर बँकाच्या विलनीकरणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात सरकारने इंडियन बँकेला इलाहाबाद बँकेमध्ये विलीन केले आहे. याचा व्यवसाय आता 8.08 लाख कोटी रुपयांच्या असणार आहे.

तर कॅनरा बँकला सिंडिकेट बँकमध्ये विलीन केले आहे.

याशिवाय सरकारने युनियन बँक ऑफ इंडियाला आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक बरोबर विलीन केले आहे. ही बँक आता सार्वजिनक क्षेत्रातील 5 वी सर्वात मोठी बँक असेल.

आरोग्यविषयक वृत्त –