पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप ! जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात – ‘सिर्फ नाम ही काफी है !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सदानंद दाते यांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. पिक्चरमधील डायलॉग असतोना सिर्फ नाम ही काफी है तसं दाते साहेबांबद्दल बोलता येईल. एक कर्तव्यनिष्ठ, स्वच्छ आणि कर्तव्यकठोर अधिकारी आपल्याला या पोलीस आयुक्तालयाला पहिला आयुक्त म्हणून लाभला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचं कौतुक केलं.

आज मिरा-भाईंदर , वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी आपलं मनोगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आणि अभिमान आहे की, आपलं सरकार आल्यानंतर आपण मिरा-भाईंदर, वसई-विरार यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे लोकार्पण केले. हे नवीन आयुक्तालय म्हटल्यानंतर अजूनही काही गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. पूर्णत्वाची गरज आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की, अजिबात काळजी करू नका. हे सरकार तुमच्यासोबत, तुमच्या पाठी प्रत्येक पावलावर खंबीरपणे उभं आहे. मजबुतीनं उभं आहे.”

पुढे बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, “पोलीस वर्क फ्रॉम होम करू शकतात का ? मी करतो तर माझ्यावर टीका होते आहे. प्रत्येकाची कामाची एक पद्धत असते. काम होण्याला महत्त्व आहे. पोलीस वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मला म्हणायचे, दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. ही दहशत मोडून काढा. जर गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे.” असंही ते म्हणाले.