Inauguration Of New Parliament | अखेर नवीन संसद भवनाचा उद्घाटन मुहूर्त ठरला! ऐतिहासिक राजदंड असलेला सेंगोल बसवण्यात येणार

दिल्ली : Inauguration Of New Parliament | देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक असणारे सेंगोल संसदेच्या नव्या इमारतीत अभिमानाने ठेवले जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. लवकरच संसदेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन (Inauguration Of New Parliament) होणार असून यासंबंधीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलते होते की, संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेचा जोड देण्याचा सुंदर प्रयत्न आहे. तसेच उद्घाटन कार्यक्रमाला सर्व विरोधी पक्षांना आमंत्रित केलेले असून उद्घाटनावरून राजकारण न करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना केले आहे.

 

नवीन संसदेच्या इमारतीबद्दल फक्त राजकारण्याने नाही तर संपूर्ण देशाला कौतुक आणि कुतूहल आहे. येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते या वास्तूचे उद्घाटन केले जाईल. ही संसदेची नवी इमारत विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी अनेक हातांनी रक्ताचे पाणी करत मेहनत घेतली आहे. ६० हजारांहून अधिक कामगारांनी योगदान दिले असून त्यांचा यथोचित सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनप्रसंगी केले जाणार आहे. संसदेची ही नवी इमारत म्हणजे अमृतमहोत्सवी (Aazadi Ka Amritmahotsav) वर्षात पंतप्रधानांनी जे लक्ष्य निर्धारित केले होते, त्यापैकी एक पूर्ण झाले असल्याची भावना शहांनी व्यक्त केली आहे.

 

 

पुढे त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. संसदेच्या नवीन वास्तूत सेंगोल (राजदंड) ठेवला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सेंगोल (Sengol) प्राप्त असलेल्याकडून न्यायपूर्ण आणि निष्पक्ष शासनाची अपेक्षा केली जाते. तसेच सेंगोल हे भारताने (India) इंग्रजांकडून सत्ता मिळण्याचे प्रतिक आहे. सेंगोलच्या स्थापनेसाठी देशाची संसद सर्वाधिक उपयुक्त, पत्रित तसेच योग्य स्थान कुठलेच असू शकत नाही. सेंगोल (Inaugurate New Parliament Building) कुठल्याही संग्रहालयात ठेवणे योग्य ठरणार नाही. अशात देशाला संसदेची इमारत समर्पित करताना पंतप्रधानांना तामिळनाडूतून (Tamil Nadu) आलेले सेंगोल प्रदान केले जाईल, असे शहा यांनी नमूद केले.

 

भारताच्या इतिहासात सेंगोलला फार महत्त्व आहे. सेंगोल हे तमिळनाडूतील सत्तेचे महत्त्वपूर्ण प्रतिक आहे. सेंगोल हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ संपदा असा होतो. अनेक शतकांची परंपरा असलेल्या या सेंगोलची माहिती पंतप्रधानांना मिळताच त्याचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला. त्यानंतर अनेक शतकांची परंपरा असलेला सेंगोल नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये हा सेंगोल अध्यक्षाच्या (Parliament Speaker) आसनाजवळ पंतप्रधान स्थापित करतील अशी माहिती अमित शहांनी दिली.

 

 

सेंगोलचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णक्षणी सुद्धा होते. ऐतिहासिक क्षण असलेल्या १४ ऑगस्ट १९४७ रोजी
रात्री इंग्रजांच्या लॉर्ड माउंटबेटन (Lord Mountbatten) यांच्या वतीने आधीनम् श्री ल श्री कुमारस्वामी तंबीरान
यांच्या हस्ते सत्ता हस्तांतरणाच्या रुपात पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी हा संगोल स्वीकारला होता.
आता हा संगोल नवीन संसद भावनात स्थापित केला जाईल. सेंगोल म्हणजे एक प्रकारचा राजदंड असून ५ फूट लांब
असलेला हा सेंगोल न्यायाचे प्रतिक संबोधला जातो. (Inauguration Of New Parliament)

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा