पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ओऍसिस फर्टिलिटीचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओऍसिस फर्टिलिटी या पुण्यातील पहिल्या प्रगत तंत्रज्ञान आधारित वंध्यत्व निवारण केंद्राचा शुभारंभ नुकताच झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

आयुक्त हर्डीकर यांनी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. “ही एक काळाची गरज आहे, कारण अनेक जोडपी आईबाबा होण्याचे स्वप्न पाहत असतात पण अपत्यप्राप्ती पासून वंचित राहतात. ओऍसिस फर्टिलिटीचे डॉ निलेश यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अशा जोडप्यांचे अपत्यप्राप्तीचे स्वप्न पुरे होऊ शकेल याची मला खात्री आहे.” मुले होण्याचे घटते प्रमाण ही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे.

ओऍसिस फर्टिलिटी च्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा राव म्हणाल्या, पुण्यात हे फर्टिलिटी सेंटर सुरु करण्यामागे विनापत्य जोडप्याना एक मार्ग उपलब्ध  करून देणे एवढाच उद्देश नव्हता, तर नैतिकतेच्या आधारावर, पारदर्शक पद्धतीने आणि वैद्यकशास्त्राचे नियम आणि उपचारपद्धती अनुसरून अशा जोडप्यांवर उपचार करणे हेही महत्त्वाचे आहे.  आम्ही  ओऍसिस मध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल पाळून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपचार करतो आणि म्हणूनच आमच्या प्रयत्नांना यश येण्याचे प्रमाण मोठे आहे.”

“अनेक जोडपी उपचार घेण्यात विलंब करतात. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जोडप्यातील दोघांचे वय ३० पेक्षा जास्त असेल आणि वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांच्या साह्याने प्रजनन तंत्रज्ञानाची मदत शक्य तेवढी लवकर घेतली पाहिजे ,” असे त्या म्हणाल्या.

ओऍसिस फर्टिलिटी चे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ निलेश बलकवडे म्हणाले, “अधिकाधिक घातक होत चाललेले जीवनशैलीतील बदल आहेत, लग्ने उशीरा होणे, नोकरी-व्यवसाय करणा-या महिलांचे वाढते प्रमाण , व्यायामाचा अभाव, फास्ट फूड सेवन, मद्य आणि तंबाखूचे सेवन आणि लठ्ठ पणाचे वाढते प्रमाण यामुळे वंध्यत्व अधिक प्रमाणात येत आहे.

उच्चशिक्षित महिला लग्न आणि अपत्यजन्म दोन्ही लांबणीवर टाकण्याची शक्यता जास्त असते. करिअर आणि कामाचा पसारा यामुळे त्या कुटुंबाचा आकारही लहान ठेवतात. वंध्यत्वाची समस्या आता शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतही प्रकर्षाने दिसू लागली आहे. आमच्या कडे तपासणीसाठी येणा-या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागांतील जोडप्यांची संख्या मोठी आहे. “

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like