पाणंद रस्ते कामाचे उद्घाटन

थेऊर : गावकऱ्यांनी विकास कामात समन्वय साधून विकासाचा वेग प्राप्त होतो गावकऱ्यांनी विकास कामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी केले ते केसनंद (ता. हवेली) येथे पालकमंञी पाणंद रस्ते योजनें अंतर्गत दोन पाणंद रस्ते कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे आदी उपस्थित होते.

या पाणंद रस्त्याचा फायदा ५० हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. ग्रामस्थांनी असाच समन्वय साधून कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, रस्ते इत्यादी योजना यशस्वी करता येतील असे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.

याअगोदर वाघोली मंडळ क्षेञात कौरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रशासकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,पोलीस विभाग व निर्वाचित लोकप्रतिनिधी यांची बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी अधिकारी डॉ वर्षा गायकवाड, सचिन खरात,पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, तलाठी बाळासाहेब लाखे इतर प्रशासकीय अधिकारी तसेच केसनंदच्या नवनिर्वाचित सरपंच केसनंद रोहिणी सचिन जाधव,उपसरपंच सुनिता दिनेश झांबरे, मिलींद हरगुडे,वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे या बैठकीला उपस्थित होते. प्रतिबंधात्मक उपायकरीता केलेली कार्यवाही व अडचणी जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. यात सुधार आणण्याकरीता अधिकाधिक विनामास्क फिरणार्यांवर कडक दंडात्मक कारवाई करणे गृहविलगीकरण करण्यात आलेल्या बाधित यांनी सुचनांचे पालन न केल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरणात हालविण्या बाबत सुचना दिल्या तर यावेळी प्रशासकांनी मांडलेल्या अडचणींवर अपेक्षित सहकार्य व निधी तात्काळ देण्यात येईल याची ग्वाही दिली आहे. तसेच या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली व उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी मार्गदर्शन केले आहे.