ग्रामपंचायत पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर 1 कोटी 54 लक्ष रकमेच्या इतर विविध विकास कामांचा उदघाटन व भूमिपूजन समारंभ पार पडला.

यावेळी शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांची महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला, तसेच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशु संवर्धन विभागाच्या मा. सभापती सुजाता पवार, जि. प. सदस्य राजेंद्र जगदाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, रा. कॉं. पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, कृ. उ. बाजार समितीचे सभापती शंकरदादा जांभळकर, मा.उ पसभापती विश्वास ढमढेरे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, पंचायत समितीच्या उपसभापती सविताताई पऱ्हाड, सदस्या अर्चनाताई भोसुरे, घो. स. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, संचालक शिवाजी वडघुले, अशोक कोळपे, विक्रम चव्हाण, दत्तात्रय फराटे, पारोडीच्या मा. सरपंच ज्योतीताई टेमगिरे, चैताली शिवले, निलिमा सातकर, लक्ष्मण शिवले, रामचंद्र शिवले, मोहन येळे, नवनाथ शिवले, भाऊसाहेब येळे, विद्यमान सदस्य अविनाश येळे, कमल शिवले, दत्तात्रय शिवले, संभाजी टेमगिरे, राहुल ढमढेरे, राहुल शिवले, सचिन सातकर, दादा टेमगिरे, जालिंदर भोसले, जि. प. प्रा. शाळा पारोडी, सातकरवाडी, व शिवतक्रार म्हाळुंगी येथील सर्व शिक्षक वृंद, प्रा. आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.