संभाजी पोलीस चौकीच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेतर्फे विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या अंकित असलेल्या संभाजी पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उदघाटन सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त डॉ.के व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र शिसवे आणि पोलीस उपायुक्त डॉ.स्वप्ना गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापौर निधीतून चौकीच्या नूतनीकरणासाठी सव्वा कोटी रुपये आणि खासदार गिरीश बापट यांच्या खासदार निधीतून दहा लाख रुपये देण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रमांसाठी पोलीस यंत्रणेला या अत्याधुनिक पोलीस चौकीची फार मदत होणार आहे. या चौकीत महिला पोलीसांसाठी स्तनदा कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्याचा फायदा सामान्य स्त्रीयांनाही गर्दीच्या वेळी होईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. चौकीच्या नूतनीकरणासाठी महापौरांनी पुढाकार घेतल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक राजेश येनपुरे यांनी केले. नगरसेविका गायत्री खडके यांनी आभार मानले. याप्रसंगी दीपक पोटे आदी नगरसेवक उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –