तक्वा ज्वेलर्सच्या सातव्या शाखेचे उद्घाटन

कोंढवा : पोलिसनामा ऑनलाईन – तक्वा ज्वेलर्सच्या सातव्या शाखेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळेच्या हस्ते करण्यात आले. कोंढवा खुर्द येथील कोणार्क मालंमध्ये तक्वा ज्वेलर्सच्या हि सातवी शाखा सुरु झाली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी येथील दागिन्याची प्रशंसा केली व यांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

तक्वा ज्वेलर्सचे संचालक असरार इनामदार यांनी सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसादरत्न मिळाल्या बद्द्ल पुष्प गुच्छ देऊन सत्कार केले. असरार इनामदार म्हणाले आमच्या येथील खासियत म्हणजे सोने मोडीवर कसलीही घट आकरली जात नाही किवां रोख स्वरुपात पैसे हवे असल्यास त्यावर सुद्धा पैसे कपात केली जात नाही, ज्या कॅरेटचे सोने तोच भाव येथे आकारले जातो. तसेच सोने तारणावर व्याज आकाररून सोने ठेवले जात नाही. जवळपास १३२ कर्मचारी तक्वा ज्वेलर्समध्ये काम करित आहेत. अल्पावधीत तक्वा ज्वेलर्सने ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून पहिल्या दिवशीच महिलांनी सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.याप्रसंगी केडीम दागिन्यावर मजुरी नाही, जुन्या दागिन्यावर पालीश फ्री, १८ कॅरेट व ९१६ हाॅलमार्कच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५०% सवलत दिली जाणार आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण, नगरसेविका परवीन फिरोज शेख, हमीदा सुंडके, नंदा लोणकर,माजी नगरसेवक फारुख इनामदार, रईस सुंडके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके, हाजी फिरोज शेख,जालिंदर कामटे, हसीना इनामदार, तक्वा ज्वेलर्सचे संचालक असरार इनामदार, इस्माईल इनामदार, सह संचालक मुज्ज्फर पटेल, बसित शेख यावेळी उपस्थित होते.