सिंहगड रोडवर ‘सिद्धकला मेडिकल्स्’ या पहिल्या जेनरिक मेडीकल शॉपचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पहिले जेनरिक मेडिकल शॉप सुरु करण्यात आले आहे. या शॉपचे उद्घाटन नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि उद्योजक आनंद गिल्डा यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात आले. यावेळी डॉ. वाडेकर, एफडीएचे निवृत्त कमिशनर साळुंके उपस्थित होते. सिद्धकला मेडिकल्स् हे जेनरिक मेडीकल शॉप सिंहगड रोडवरील जुन्या रजिस्ट्रेशन ऑफिससमोर सुरु करण्यात आले आहे.

सिंहगड रोड परिसरातील हे पहिलेच जेनरिक मेडिकल शॉप असून याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे. या जेनरिक मेडिकल शॉपमध्ये सर्व प्रकारची औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.

आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समाजातील सर्व वर्गातील लोकांना अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात ओढले आहे. या आजारांशी सामना करताना औषधं सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता जेनरिक औषधांचा पार्याय उपलब्ध आहे. सिद्धिकी जेनरिक मेडिकलच्या माध्यमातून सिंहगड रोड पसरिसरातील नागरिकांना जेनरिक औषधे उपलब्ध होणार असून याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा असे आवाहन आनंद गिल्डा यांनी केले आहे.