पासपोर्ट कार्यालयाचे रक्षा राज्य मंञी डॉक्टर भामरे यांच्या हस्ते उद्घाटन

धुळे : पोलीसनामा ऑनलाई – टॉवर बगीच्या जवळील मुख्य टपाल कार्यालयातच नूतन पासपोर्ट कार्यालयाचे फित कापून केंद्रीय संरक्षण राज्य मंञी डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. कोनशीला अनावरण करुन संगणाकाद्वारे प्रथम पासपोर्ट रिकवेस्टला क्लिक करून संमती दिली.

यानंतर आपल्या भाषणात डॉक्टर भामरे यांनी सांगीतले की अगोदर पासपोर्ट तयार करण्यासाठी मुंबई पर्यत खेट्या माराव्या लागत असे. परंतू दोन महिन्यापुर्वी उद्योजकांचे एक शिष्ट मंडळाची भेट घेतली व त्यांना दिलेला शब्द आज पुर्ण केला. साधारण लोकांना हि परदेशात जाण्याची संधी मिळेल व हौस, मौज पूर्ण करता येईल. कारण कमी हजारातच परदेशी दौरा करता येतो व साधारण मध्यम वर्गीयांना हे स्वप्न पूर्ण करता येईल. विर अभिनंदन यांची सकाळीच भेट घेतली असे हि त्यांनी सांगितले. सैनिकांच्या पराक्रमाचे कौतूक केले.

पंतप्रधानानी दिलेला शब्द हि अतिरेकी कारवाई हल्लाचे चोख उत्तर देत पुर्ण केले आहे. सगळ्यांना पासपोर्ट चा चांगला फायदा होईल असे हि सांगीतले. पर्यटन मंञी जयकुमार रावल यांनी भ्रमण ध्वनीहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमूख अनूप अग्रवाल, पोस्ट मास्टर व्ही एस जयशंकर, क्षेञिय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा, अनंत रसाळ, व मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.