बँक ऑफ बडोदाच्या नूतनीकृत शाखेचे उद्घाटन

थेऊर – बँक ऑफ बडोदा ही सध्याची आघाडीची बँक असून मागणीपूरक योजनांची आखणी करण्याकडे बँकेचा कल आहे या बॅंकेने शेती व गृह योजनांचे व्याजदर बरेच कमी केलेले असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बॅंकेचे विभागीय प्रमुख के के चौधरी यांनी केले. ते बँक ऑफ बडोदा थेऊर शाखेच्या नूतनीकृत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख निखिल मोहन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर अनेक बॅंकेचे ग्राहकही उपस्थित होते. बँक ऑफ बडोदा थेऊरफाटा येथे गेली अनेक वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासात सार्थ उतरलेले असून सध्याच्या स्पर्धेच्या युगातही या शाखेने खुप चांगली कामगीरी पार पडली आहे. या शाखेचे शाखाधिकारी वैभव पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तर प्रमोद भट्ट यांनी आभार मानले