Kolhapur News : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते दुधाळीतील अत्याधुनिक एअर रायफल रेंजचे उद्‌घाटन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी जडत आहे कोल्हापुरातील दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक दहा मीटर एअर रायफलच्या रेंजचे उदघाटन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहेत. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते, या युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असेही आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिवंगत सखाराम बापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला शूटिंगची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शूटिंगला जो इतिहास आहे. तो यापुढेही कायम राहील. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ. या उदघाटनाप्रसंगी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.