बोलता-बोलता आला ‘हार्ट अटॅक’, फक्‍त 2 सेकंदात मृत्यू, घटना CCTV त रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक बावीस वर्षीय तरुण आपल्या घराच्या बाहेर कोणाशीतरी बोलत उभा होता. अचानक त्याला काहीतरी जाणवले आणि त्याने रस्त्याच्या दिशेने धाव घेतली इतक्यात अचानक दोन सेकंदासाठी त्याच्या शरीरात झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. उत्तराखंड मधील हरिद्वार येथे घडलेली ही घटना आहे.

बात करते-करते आया हार्ट अटैक, 2 सेकंड में मौत, CCTV में र‍िकॉर्ड

हरिद्वारच्या ज्वालापूर हद्दीत शोएब नामक युवक राहत होता आणि तेथील स्थानिक मार्केटमध्ये काम करत होता. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो कोठूनतरी घरी आला आणि त्यानंतर घराच्या बाहेर येऊन कोणाशी तरी बोलू लागला. रस्त्यावरून लोक ये जा करत होते त्यामुळे काहीच वेगळे वाटत नव्हते.

बात करते-करते आया हार्ट अटैक, 2 सेकंड में मौत, CCTV में र‍िकॉर्ड

अचानक शोएबला छातीत दुखल्यासारखे वाटले आणि तो रस्त्याच्या दिशेने धावू लागला.तो रस्त्याच्या मध्येच आला होता आणि अचानक चक्कर येऊन तो खाली पडला. आसपास उभे असलेले लोक सुद्धा आश्चर्य व्यक्त करू लागले की या मुलाला अचानक काय झाले.

रस्त्यावर पडताच त्याचा दोन सेकंदात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आसपासच्या लोकांनी त्याला दवाखाण्यात नेण्याआधीच त्याचा मृत्य झाला होता. ही सर्व घटना बाजूच्या दुकानात लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. लोकांनी या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या वेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Visit : Policenama.com