लग्नाच्या पहिल्या दिवशी पती रात्री मेडिकल दुकानात गेला, नवरा घरी परतण्यापुर्वी नवविवाहीत तरूणीनं केलं ‘कांड’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश राज्यातील वैराग्यपूर येथे एक अजब घटना घडली आहे. एक नवीन विवाहित झालेली तरुणी लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरामधून पळून घेल्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत भिंड कोतवाल पोलीस ठाण्यात नोंद केली गेली आहे.

अधिक माहिती अशी की, वैराग्यपूर येथील मनोज सोनी यांचा मुलगा गोपाळने एका व्यक्तीच्या ओळखीने संबंधित तरुणीशी विवाह केला. ज्या व्यक्तीने गोपाळसोबत या तरुणीशी ओळख करुन दिली. त्या व्यक्तीला गोपाळने स्वखुशीने ३५ हजार रुपये सुद्धा दिले. यानंतर गोपाळने संबंधित काही कुटुंबियांना घेऊन त्याने त्या तरुणीशी लग्न केले.

या दरम्यान, विवाह झाल्यानंतर रात्री गोपाळ आपल्या जेव्हा रूममध्ये गेला. त्यावेळी तरुणीने अर्थात नवरीने आपल्या पोटात भयंकर वेदना होत आहेत. पोट दुखत आहे म्हणून गोपाळला सांगतिले. यावरून गोपाळला वाटले की, गरम वातावरणामुळे तिला पोटात वेदना होऊ लागल्या असेल. गोपाळने त्या संबंधित तरुणीला काही न बोलता बाहेर फिरण्यास सांगितले. परंतु, फिरल्यानंतर देखील तिला फरक जाणवत नसल्याचे संबंधित तरुणीने गोपाळला सांगितले. त्यानंतर गोपळने मी मेडिकलमधून औषध घेऊन येतो असं म्हटलं. त्यानंतर मेडिकलमधून घरी आल्यावर गोपाळ बघतो तर, संबंधित तरुणी घरातच नव्हती. आणि घरातील असणाऱ्या सर्व महागड्या वस्तू देखील जागेवर नव्हत्या. यावरून गोपाळच्या लक्षात आले कि, आपल्याबरोबर धोका झाला आहे. त्यावेळी क्षणाचा विलंब न करता तात्काळ गावातील पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली.