हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये सहभागी करा ‘या’ 10 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : हाय ब्लड प्रेशर हृदयाशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. ब्लड प्रेशरचा धोका दोन प्रकारचा असतो. पहिला सिस्टॉलिक म्हणजे हाय ब्लड प्रेशर, जो 130एमएम एचजे पेक्षा कमी झाल्यास रूग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो. दुसरा, डिस्टॉलिक ब्लड म्हणजे लो ब्लड प्रेशर जो 80एमएम एचजी पेक्षा कमी होणे चिंताजनक आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बहुतांश लोक औषधांचा आधार घेतात. परंतु जास्त औषधे सेवन केल्याने नुकसान सुद्धा होऊ शकते. यासाठी डाएटमध्ये सुधारणा केल्यास हाय बीपीचा धोका कमी करता येऊ शकतो.

या 10 गोष्टींचा आहारात करा समावेश

* लिंबू, संत्रे आणि द्राक्षासारख्या आंबट फळात ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याची क्षमता असते. यात अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असल्याचे जोखीम कमी होते.
* ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते. यासाठी सॅलमन मासे उपयोगी ठरतात. हे फॅट शरीरात जाऊन ब्लड प्रेशर कंट्रोल करते शिवाय रक्तपेशी आणि सूजवर परिणाम करते.
* मॅग्नेशियम, पोटॅशियम, अर्जीनीन आणि अमीनो अ‍ॅसिड भरपूर असलेले भोपळ्याचे बी उपयोगी आहे. याचे तेल सुद्धा परिणामकारक ठरते.
* डाळ आणि शेंगभाज्या सेवन करा. रक्तप्रवाह चांगला राहतो.
* बेरीजच्या सेवनाने ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोल राहते.
* राजगिरा सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर लेव्हल कमी करता येते. जोखीम कमी होते.
* पिस्ता सुद्धा हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर दोन्ही सहजपणे बॅलन्स करू शकतो.
* मॉर्निंग डाएटमध्ये गाजरच्या सेवनाने ब्लड प्रेशरची समस्या दूर ठेवता येऊ शकते.
* ब्रोकलीच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो.
* संशोधनानुसार रोज पालक सूप प्यायल्याने हाय आणि लो ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो.