सांधेदुखीनं परेशान आहात ? आहारतील ‘हे’ 8 सोपे बदल ठरतील फायदेशीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज काल लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांमध्ये सांधेदुखीची समस्या दिसून येत आहे. सांधेुखीलाच संधीवात किंवा आर्थरायटीस असंही म्हणतात. या आजाराचे 100 हून अधिक प्रकार पाहायला मिळतात. सांध्यांमधील वेदना यात प्रमुख लक्षणं आढळतात. महिला, पुरुष, लहान मोठे असा साऱ्यांमध्येच हा आजार आढळतो. तसं तर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येतं. याशिवाय वय वाढत जातं तसं आजाराचं प्रमाणंही वाढलेलं दिसून येतं.

ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास असतो अशा लोकामध्ये सांध्यात अनेक वेदना दिसून येतात. याशिवाय चालताना किंवा फिरतानाही त्यांना समस्या येतात. परंतु तुम्ही आहारात जर काही बदल केले तर यापासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. आज आपण अशाच काही सुपरफुड्सबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही सांधेदुखीची समस्या दूर करू शकता.

1) ऑलिव्ह ऑईल – जर तुम्ही रोज 2-3 महिने ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश केला तर संधीवाताची समस्या कमी होऊ शकते. नेहमीच्या तेलापेक्षा जर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर केला तर जास्त फायदा मिळेल.

2) सिट्रस फ्रूट्स म्हणजेच आंबट फळं – मोसंबी, संत्री, लिंबू अशा सिट्रस फ्रूट्समध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जर तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आहारात या फळांचा समावेश करणं जास्त फायदेशीर ठरतं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश जास्त राहिल याकडेही लक्ष द्यायला हवं.

3) दही – संधीवातावर दही जास्त फायदेशीर ठरतं. शरीरातून सूज दूर करण्यासाठीही याचा खूप फायदा होतो.

4) ग्रीन टी – 1 कप ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉल्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. संधीवाताच्या रुग्णांसाठी याचा खूप फायदा होतो. विशेष म्हणजे यात मुबलक प्रमाणात अंटी ऑक्सिडंट्स असतात.

5) दलिया – शरीरातील कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर यासाठी सर्वात उत्तम पदार्थ आहे तो म्हणजे ओट्स. संधीवातासाठीही याचा खूप फायदा होतो. सकळच्या नाष्यात जर तुम्ही दलियाचं सेवन केलं तर याचाही खूप फायदा होतो.

6) हळद – एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, ऑस्टियोऑर्थरायटीसच्या रुग्णांनी जर आहारात हळदीचा समावेश केला तर सांध्यांमधील वेदनांपासून सुटका मिळवण्यास मदत होते. याशिवाय आलं, दालचिनी, लाल मिरच्या यांचाही खूप फायदा होतो.

7) होलग्रेन ब्रेड -होलग्रेन रक्तातील CRP-C रिअॅक्टीव प्रोटीनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. याचा संबंध डायबिटीज आणि हृदयाच्या आरोग्यासोबतही असतो. म्हणून होलग्रेन ब्रेड तुमच्या ओव्हरॉल हेल्थसाठी उत्तम असतं.

8) लसूण – लंडनमधील एका रिसर्चनुसार, योग्य प्रमाणात जर लसणाचं सेवन केलं तर आर्थरायटीसचा धोका कमी होतो. याशिवाय तुम्ही आहारात कांद्याचाही समावेश करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.