Health Tips : ‘या’ फळांचा आहारात समावेश केल्यास ‘हेल्दी’ राहतील तुमचे डोळे, मोतीबिंदूपासून मिळेल ‘सूटका’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. असे अनेक पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने तुमचे डोळे निरोगी राहू शकतील. जर तुम्ही या पदार्थांचे नियमित सेवन केले तर मोतिबिंदुसारख्या आजाराचा धोका देखील राहणार नाही.

सिट्रस फूड : सिट्रस फूड म्हणजे आंबट फळं डोळ्यासाठी उपयुक्त असतात. सिट्रस फूडमध्ये विटामीन सी असते. सोबतच यामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहू शकतील. रोज कमीत कमी दोन सिट्रस फूड खाल्ले पाहिजे.

अंडी : अंड्याचा बलक खाल्ल्याने देखील डोळ्याचा पडदा निरोगी राहतो. यामध्ये असणारे जिंक डोळ्यासाठी उपयुक्त असते.

हिरव्या पालेभाज्या : या भाज्या डोळ्यांना मोतिबिंदुपासून वाचवतात. यामध्ये पालक खूप फायदेशीर असतो. त्यामुळे नियमित हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे.

ड्रायफ्रूट आणि ऑइल सीड्स : ड्रायफ्रूट थंडीच्या दिवसात अधिक प्रमाणात खाल्ले पाहिजेत. याचे सेवन केल्याने डोळ्यांना फायदा होतो, आणि आपण निरोगी राहू शकतो. यामध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी असिड शरीरसाठी चांगले असते.

एंटी लेयर स्कीन : अनेक तास मोबाइल आणि लॅपटॉप चा वापर जास्त केल्याने त्याचा डोळ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यात कोरडेपणा येऊ शकतो. म्हणून एंटी लेयर स्कीन वर काम केल्याने डोळ्यांवर परिणाम हॉट नाही.