Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : Income Tax Alert | जर तुम्ही बहुतांश व्यवहार रोखीने (Cash) करत असाल तर सावध व्हा. तुमच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax) ची नजर असू शकते. आता रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर विभाग विशेष प्रकारे लक्ष ठेवत आहे. विभागाचे (Income Tax Alert) तुमच्या प्रत्येक ट्रांजक्शनवर लक्ष आहे. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. याबाबत कोणते नियम आहेत ते जाणून घेवूया (Income Tax Notice Kadhi Yete).

नियम केले कडक
प्राप्तीकर विभागाने बँक (Bank), म्युच्युअल फंड हाऊस (Mutual Fund House), ब्रोकर प्लॅटफॉर्म (Broker Platform), प्रॉपर्टी इत्यादींमध्ये रोख गुंतवणुकीबाबत कडक धोरण अवलंबले आहे. जर तुम्ही रोखीचे मोठे व्यवहार करत असाल तर त्याची माहिती प्राप्तीकर विभागाला द्यावी लागेल. तुमच्यासाठी समस्या निर्माण करणाऱ्या अशाच काही ट्रांजक्शनबद्दल आम्ही सांगत आहोत.

१० लाख रुपयांचे कॅश ट्रांजक्शन
जर तुम्ही कोणतेही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये रोख व्यवहार करत असाल तर तुम्ही एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंतच कॅश ट्रांजक्शन करू शकता. जर तुम्ही त्यात पैसे गुंतवत असाल तर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरू नका. असे केल्यास विभाग नोटीस पाठवू शकतो. (Income Tax Alert)

एफडीमध्ये १० लाख रुपयांची गुंतवणूक
जर एखादा व्यक्ती वर्षातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा FD मध्ये १० लाख रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम जमा करत असेल तर, प्राप्तीकर विभाग पैशाच्या स्रोताविषयी माहिती मागू शकतो. शक्य असेल तर एफडीमध्ये बहुतांशपैसे ऑनलाइन किंवा चेकद्वारे जमा करा.

खात्यात १० लाख जमा
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या एका खात्यात १० लाख किंवा त्याहून जास्त रक्कम रोख स्वरूपात किंवा एका आर्थिक वर्षात एकापेक्षा जास्त खात्यात जमा केली तर प्राप्तीकर विभाग या पैशांची माहिती मागू शकतो. चालू खात्यांमध्ये कमाल मर्यादा ५० लाख रुपये आहे.

Advt.

रोखीने क्रेडिट कार्डचे बिल भरणे
जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल रोख स्वरूपात जमा केले किंवा तुम्ही एका वेळी १ लाखापेक्षा जास्त कॅश क्रेडिट कार्डच्या
बिलाच्या रूपात जमा केली, तर प्राप्तीकर विभाग तुमच्याकडून माहिती घेऊ शकतो.
तसेच, तुम्ही एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे क्रेडिट कार्ड बिल रोखीने भरले तरीही,
पैशाच्या स्रोताबद्दल विचारणा होऊ शकते.

प्रॉपर्टी कॅशने खरेदी किंवा विक्री केल्यास
जर तुम्ही कॅशमध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे मोठे ट्रांजक्शन केले तर त्याचा रिपोर्ट प्राप्तीकर विभागाकडे जातो.
जर तुम्ही ३० लाख रुपये किंवा त्याहून जास्त किमतीची प्रॉपर्टी रोखीने खरेदी किंवा विक्री करत असाल तर
त्याची माहिती मालमत्ता निबंधक प्राप्तीकर विभागाला पाठवतात.

Web Title :- Income Tax Alert | income tax alert notice for these cash transactions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारचा अनोखा अंदाज पाहून ट्विंकल खन्नाने केले ट्रोल

Ashish Shelar | ‘काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा