1 एप्रिलपासून PF आणि Tax संबंधित ‘या’ 5 नियमांमध्ये होतोय बदल; तुम्हीही जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल दुप्पट TDS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ एप्रिलपासून पैशांशी आणि करांशी संबंधित बरेच बदल होणार आहेत ते तुम्ही आजच माहिती करून घ्या. बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिडल क्लास आणि सॅलरीड क्लास यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. हे नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहेत. ज्या लोकांचे वय ७५ पेक्षा जास्त आहे त्यांना टॅक्सपासून सवलत दिली गेली आहे. म्हणजेच त्यांना टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही. नेमके कोणते बदल झाले आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. EPF वर टॅक्स
इन्कम टॅक्स विभागामार्फत जरी केलेल्या नवीन नियमांनुसार १ एप्रिल २०२१ पासून पीएफचे २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान केल्यास तुम्हाला व्याजावर कर भरावा लागेल. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय अधिकाधिक सॅलरी कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन हा घेतला आहे. याचा परिणाम केवळ २ लाख रुपयांच्या मासिक पगारावर होईल.

२. दुप्पट TDS भरावा लागेल
आयटीआर दाखल करण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. सरकारने नवीन नियम बनविला आहे की जे आयटीआर दाखल करणार नाहीत त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागेल. सरकारने आयकर कायद्यात कलम २०६ एबी जोडले आहे. या कलमानुसार, जर आता आयटीआर दाखल केला नाही तर डबल टीडीएस १ एप्रिल २०२१ पासून भरावा लागेल.

नवीन नियमानुसार १ जुलै २०२१ पासून दंडात्मक टीडीएस आणि टीसीएलचे दर १० ते २० टक्के असतील जे सामान्यतः ५ ते १० टक्के असतील. आयटीआर दाखल न करणाऱ्यांसाठी टीडीएस आणि टीसीएसचे दर दुप्पट करून ५ टक्के अथवा निश्चित दर जे काही अधिक असेल ते वाढविले जाईल.

३. LIC ला मिळेल फायदा
सरकार आपल्या LIC योजनेचा विस्तार करीत आहे. नवीन आर्थिक वर्षात ही योजना लागू केली जाईल. कोरोना संसर्गामुळे एलआयसी कर लाभाचा लाभ न घेतलेल्या कर्मचार्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणारा आहे.

४. प्री-फील्ड ITR फॉर्म मिळेल
कर्मचाऱ्यांचा विचार करून सरकारने टॅक्स रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेला सोपे केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून इंडिविडुअल टैक्सपेयर्स ला प्री-फील्ड ITR फॉर्म प्रदान केला जाईल. यामुळे आयटीआर दाखल करणे सुलभ होईल.

५. ७५ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या लोकांना टॅक्सपासून मुक्ती
अर्थमंत्र्यांनी घोषणा केली होती की ७५ वर्षांहून जास्त वय असलेल्या लोकांना टॅक्स भरावा लागणार नाही. ही सूट अशा वयोवृद्ध लोकांना आहे जे पेन्शन अथवा फिक्स डिपॉजिटवर मिळणाऱ्या व्याजावर आधारित आहेत.