‘कोरोना’चा परिणाम कमी करण्यासाठी ‘हे’ सरकार नागरिकांना घरोघरी जाऊन देणार 74000 रूपयाचा चेक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने चांगलाच कहर केला आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांवर होत आहे. त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अमेरिकी कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन मेनुचिन यांनी मंगळवारी अमेरिकेतील वृद्धांना 1000 अमेरिकी डॉलर (74 हजार रुपये) पर्यंतचा चेक देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निधीसाठी सरकारला 1 लाख कोटी डॉलर खर्च करावा लागेल. याचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होईल. कारण शेकडो अरब डॉलरची गुंतवणूक होईल. वृत्तानुसार, अद्याप या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती समोर आली नाही.

अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने आर्थिक मंदीचा धोका ओळखून व्याज दरात कपात करुन जवळपास शुन्य केले आहे. ट्रम्प यांनी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्र न येण्याची विनंती केली आहे. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त काळ घरात राहण्याचे आणि जमेल तितके काम घरुन करण्यास सांगितले आहे. देशभरातील शाळा, कार्यालये, बार, रेस्टॉरेंट आणि अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत.

अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 1930 च्या दशकात आलेल्या महा आर्थिक मंदीतून निघताना सर्वात प्रभावी उपायांपैकी एक होता. परंतु अशा कोणत्याही योजनेला राबवण्यासाठी संसदेतून मंजुरी आवश्यक असते. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक अशा दोघांना मिळून काम करायला हवे.

अमेरिकेसारख्या विकसित देशात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 105 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे केंद्र बिंदू असलेल्या चीनच्या वुहान शहरात सलग दुसऱ्या दिवशी फक्त 1 नवा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला.