एप्रिलपासून सुकन्या आणि PPF अकाऊंट संदर्भात मोठे बदल ! आता देखील नाही द्यावा लागणार ‘या’ 9 उत्पन्नावर टॅक्स, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – 1 एप्रिल 2020 सुरू होणार्या आर्थिक वर्षात दोन टॅक्स सिस्टम मिळतील. यामध्ये तुम्हाला ठरवावे लागेल की कुठली तुमच्यासाठी योग्य आहे. आर्थिक सल्लागार सांगतात की, नवी टॅक्स सिस्टम निवडणार्यांना 70 टॅक्स एग्झम्पशन आणि डिडक्शनचा लाभ मिळणार नाही. यामध्ये 80 सी अंतर्गत गुंतवणुकीवर मिळणारी 1.5 रुपयापर्यंतची सूट, सेक्शन 80डी अंतर्गत हेल्थ इंन्श्युरन्स प्रीमियम पेमेन्ट आणि 80टीटीए अंतर्गत बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस खात्यातील जमेवर मिळणार्या व्याजावर डिडक्शनही सहभागी आहे. परंतु, 30 अशा सवलती आहेत ज्या पुढेही सुरू राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतीचे उत्पन्न, पीपीएफ आणि सुकन्या खात्याच्या व्याजाच्या रक्कमेवर सूट मिळत राहणार आहे.
प्रश्न – जर मी नवी टॅक्स सिस्टम निवडली तर मला पीपीएफ, ईपीएफतून मिळणार्या व्याजाच्या उत्पन्नावर टॅक्स सूट मिळेल का.
उत्तर – कर तत्ज्ञ सांगतात की, नवी टॅक्स व्यवस्था निवडल्यास पीपीएफ, ईपीएफमधील गुंतवणुकीवर सूट मिळणार नाही. परंतु, पीपीएफमधून मिळणार्या व्याजावर सूट मिळत राहिल. कर्मचारी भविष्य निवार्ह निधीवरील व्याजावर कोणताही टॅक्स लागणार नाही. नव्या स्लॅबनुसार पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला टॅक्स सूट मिळणार नाही. परंतु, यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्सच्या टप्प्यात येणार नाही.
पगारातून कपात होणार्या ईपीएफवर 9.5 टक्केपर्यंत व्याजावर कोणताही टॅक्स लागणार नाही. यशिवाय ईपीएफ आणि एनपीएसमध्ये कंपनीकडून जमा रक्कमसुद्धा टॅक्स फ्री होईल. परंतु, वार्षिक 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कमेवर हा फायदा होईल. तर पीपीएफमध्ये पैसे जमा केल्यानंतर टॅक्स सूट मिळणार नाही. परंतु मॅच्युरिटीची रक्कम आतासुद्धा टॅक्स फ्री असणार आहे.
प्रश्न – मी माझ्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडले आहे, तर 1 एप्रिलपासून काय होणार?
उत्तर – कर तज्ज्ञ सांगतात की, जुनी टॅक्स सिस्टम निवडणार्यांना सवलतीसह जुने फायदेही मिळत राहतील. तर, नवी टॅक्स सिस्टम निवडल्यास सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणार्यांना व्याजावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. परंतु, पहिल्याप्रमाणे सुकन्या खात्यावर कलम 80सी अंतर्गत पैसे जमा केल्यानंतर 1.50 लाख रुपयांपपर्यंतची सूट आता मिळणार नाही.
नव्या टॅक्स व्यवस्थेत मिळत राहतील या कर सवलती
1. भाड्यावर स्टँडर्ड डिडक्शन
2. शेतीतून होणारे उत्पन्न
3. पीपीएफवर मिळणारे व्याज
4. वीम्याच्या मॅच्युरिटीची रक्कम
5. मृत्युमुळे वीम्यातून मिळालेली रकम
6. डिडक्शनवर मिळालेली भरपाई
7. रिटायरमेन्टवर लीव इन्कॅशमेन्ट
8. वॉलेन्ट्री रिटायरमेन्ट
9. सुकन्या समृद्धी खात्यावर मिळरणारी रक्कम
प्रश्न – पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणार्यांना नव्या टॅक्स सिस्टममधून फायदा होईल का?
उत्तर – टॅक्स एक्सपर्ट सांगतात की, इन्कम टॅक्स अॅक्ट 10(15)(आय) अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात जमा रक्कमेवर मिळणार्या व्याजावर मर्यातीत सीमेपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच वैयक्तिक खात्यासंबंधित प्रकरणात टॅक्स सवलतीची सीमा 3,500 रुपये आहे. तर जॉइन्ट खात्यात सात हजार रुपयांपर्यतच्या व्याजावर कोणताही टॅक्स लागणार नाही.
नव्या टॅक्स सिस्टम अंतर्गत कलम 80टीटीए अंतर्गत कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यावर मिळणार्या जुन्या सवलतीचा दावा करू शकत नाही. परंतु, एका मर्यादीत सीमेपर्यंत यावर अजूनही सूट घेऊ शकतात.
नव्या टॅक्स व्यवस्थेत नाही मिळणारी या सवलती
1. हौसिंग लोनचे प्रिसिंपल आणि व्याज
2. पीपीएफ आणि ईपीएफ मधील गुंतवणुकीवर
3. डिपॉजिटवर व्याजाचे उत्पन्न (80 टीटीए)
4. एफडी म्हणजे फिक्सड डिपॉजिट
5. मुलांची ट्यूशन फी
6. नोकरी करणार्यांचे स्टँडर्ड डिडक्शन (50 हजार रुपये)
7. एलटीए म्हणजे लीव ट्रॅव्हल अलाउन्स
8. एचआरए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स
9. मेडिकल आणि इंन्शुरन्सचे खर्च
10. 80डीडी (दिव्यांगांवरील उपचारावरील टॅक्स सूट)
11. 80यू (दिव्यांगांच्या खर्चांवर टॅक्स सूट)
12. 80ए (एज्युकेशन लोनवर टॅक्स सूट)
12. सेक्शन 16-इन्टरटेनमेन्ट अलाउन्स
13. 80 जीजी घराभाडे सूट
14. 80जी -डोनेशन (देणगीवर सूट)
15. 80 ईईबीओ इलेक्ट्रिक व्हेकलवर टॅक्स सूट
प्रश्न – व्हीआरएस-ग्रॅच्युएटीवर सवलतीचा फायदा नव्या सिस्टममध्ये मिळणार का?
उत्तर – एक्सपर्ट सांगतात की, नवी टॅक्स सिस्टम निवडणार्यांना व्हीआरएस आणि ग्रॅच्युएटीचे फायदे पहिल्याप्रमाणेच टॅक्स फ्री ठेवण्यात आले आहेत. प्रायव्हेट कर्मचार्यांना 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युएटी करमुक्त आहे. तर, सरकारी कर्मचार्यांना याची कोणतीही सीमा नाही. याशिवाय व्हीआरएस घेणार्यांना मिळणारी एकमापी रक्कम पहिल्याप्रमाणेच करमुक्त असेल. याची मर्यादा 5 लाख रूपयापर्यंत आहे.