Income Tax Deductions | करदाते 8 लाख रुपयांपर्यंत वाचवू शकतात इनकम टॅक्स! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Deductions | प्राप्तीकर 2021-22 रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यासाठी वळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. इन्कम टॅक्स कपात पद्धतींबद्दल आज जाणून घेवूयात. तुम्ही गुंतवणूक, कमाई आणि इतर प्रकारच्या पेमेंटवर कर सवलतीसाठी दावा करू शकता. ही कर कपात नवीन कर प्रणालीसाठी नाही. केवळ जुन्या टॅक्स स्लॅबमधून रिटर्न भरणारे या पद्धतींचा अवलंब करू शकतात. (Income Tax Deductions)

 

1. LIC Premium, PF, PPF, Pension Plan
एलआयसीची पॉलिसी प्रीमियमसाठी क्लेम करू शकता. भविष्य निर्वाह निधी, पीपीएफ, मुलांची ट्यूशन फी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, गृहकर्जाच्या प्रिसिंपल 80सी अंतर्गत कर सूट मिळू शकते. एलआयसी किंवा इतर कोणत्याही विमा कंपनीची वार्षिकी योजना (पेन्शन योजना) कलम 80सीसीसी अंतर्गत खरेदी केल्यास कर सवलतीचा दावा करतायेतो. 80 सीसीडी (1) अंतर्गत केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेवर क्लेम करू शकता. मात्र सर्व एकत्र घेतल्यास कर सवलत 1.5 लाख रुपयांपेक्षा मिळणार नाही.

 

2. Home loan
गृहकर्जाच्या प्रिसिंपल अमाउंटवर कलम 80सी अंतर्गत कर सवलत मिळते. ही मर्यादा 1.5 लाखांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे, 80सी अंतर्गत उर्वरित कपात 1.5 लाखांपेक्षा कमी असल्यास, गृहकर्जाच्या मूळ रकमेतून ही मर्यादा पूर्ण करून कर कपातीचा क्लेम करू शकता. (Income Tax Deductions)

 

3. Tax deduction on home loan interest
गृहकर्जावर प्राप्तीकर कलम 24(बी) अंतर्गत भरलेल्या व्याजावर कर सवलत मिळते. यावर तुम्हाला 2 लाखांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळू शकते. मालमत्ता ’Self-Occupied’ असेल तरच ही कर सवलत मिळेल.

4. Central Government Pension Scheme
केंद्राच्या नॅशनल पेमेंट सिस्टम (एनपीएस) पेन्शन योजनेतील गुंतवणूकीवर कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. ही सवलत कलम 80(सी) अंतर्गत मिळविलेले 1.5 लाख हे कर सवलतीपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानावर कलम 80 सीसीडी2 अंतर्गत दावा करता येतो. यासाठी दोन अटी आहेत.

 

5. Health insurance
आरोग्य विम्यावर कलम 80सी अंतर्गत प्रीमियमचा क्लेम करतायेतो. स्वत:साठी, पती/पत्नीसाठी, मुलांसाठी आणि पालकांसाठी घेतलेल्या आरोग्य विमा पॉलिसीवर रु. 25,000 पर्यंतच्या प्रीमियमचा दावा करू शकता. याबाबतीत पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे. तर कर सवलत मर्यादा 50,000 रुपये असेल.

 

6. Disability medical and maintenance costs
दिव्यांग अवलंबितांच्या उपचार आणि देखभाल खर्चाचा दावा करता येतो. एका वर्षात 75,000 रुपयांपर्यंत क्लेम करता येतो. जर व्यक्तीला 80 टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असेल तर वैद्यकीय खर्चावर 1.25 लाख रुपयांच्या कर कपातीचा क्लेम करता येतो.

 

7. Tax exemption on payment of medical treatment
विशिष्ट आजाराच्या उपचारासाठी 40,000 रुपयांपर्यंतच्या डिडक्शनवर प्राप्तीकर कलम 80 डीडी (1बी) अंतर्गत क्लेम करता येतो. ज्येष्ठ नागरिकाला ही मर्यादा 1 लाख रुपये आहे.

 

8. Tax relief on interest on educational loans
शैक्षणिक कर्जावरील व्याजावरील कर कपातीचा अमर्याद लाभ मिळतो. ज्या वर्षापासून कर्जाची परतफेड सुरू होते त्याच वर्षापासून टॅक्स क्लेम सुरू होतो. त्याचा फायदा पुढील 7 वर्षांसाठी मिळतो. एकूण 8 वर्षांसाठी कर सवलत मिळते. एकाच वेळी दोन मुलांच्या शैक्षणिक कर्जावर कर सवलत मिळते. दोन मुलांसाठी 25-25 लाखांचे कर्ज 10% व्याजदराने घेतले तर एकूण 50 लाख रुपयांवर वार्षिक 5 लाखांचे व्याज द्यावे लागेल. या संपूर्ण रकमेवर कर सवलत मिळते.

9. Loan on electric vehicle
प्राप्तिकराच्या कलम 80ईईबी अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन खरेदी कर्जावर भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. मात्र, ही कर सवलत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान घेतलेल्या कर्जांवरच मिळते.

 

10. Rent allowance
एचआरए पगाराचा भाग नसेल, तर कलम 80जीजी अंतर्गत घर भाड्याच्या पेमेंटचा दावा करता येतो. कंपनी एचआरए देत असेल तर हा क्लेम करता येत नाही.

 

Web Title :- Income Tax Deductions | income tax deduction ideal upto 8 lakh know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

 

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा