Income Tax कडून ‘सावधान’तेचा इशारा ! ‘हा’ SMS आल्यास होऊ शकतं बँक खातं रिकामं, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने (income tax department) फेक ईमेल आणि SMS पासून सावध राहण्याठी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इनकम टॅक्स रिफंडविषयी येणारे ईमेल आणि SMS अधिकृत नसून यापासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आयकर विभागाने संदेश जारी केला आहे. असे ई-मेल आणि SMS मिळाल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून आल्यानंतर आयकर विभागाने सोशल मीडियावर एक महत्वाची सूचना जारी केली आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी http://151.80.90.62/ITRefund या लिंकवर क्लीक करा असा SMS जर आला तर त्यावर क्लीक करू नका. कारण ती अधिकृत लिंक नाही.
करदात्याने ट्विटरवर आयटी विभागाकडून उत्तर मागितले –
हा SMS मिळाल्यानंतर एका करदात्याने शहानिशा करण्यासाठी आयकर विभागाशी संपर्क साधला आणि हा SMS ट्विटर हँडलवर शेअर करत विचारले आहे की हा SMS बरोबर आहे का? यावर आयकर विभागाने सांगितले की त्यांच्या वतीने असा कोणताही संदेश पाठविला जात नाही. हा SMS पूर्णपणे बनावट आहे.
https://twitter.com/nirmohia/status/1173213586463821824
तुम्हाला SMS मिळाल्यास काय कराल ?-
जर तुम्हाला असा SMS आला तर तो त्वरित आयटी विभागाकडून चेक करून घ्या. चेक करण्यासाठी आपण ट्विटर हँडल किंवा अधिकृत ईमेलची मदत घेऊ शकता.
बनावट SMS कसा ओळखाल ?
आयकर विभागाने बनावट SMS ओळखण्याचा एक पर्यायही सांगितला आहे. आयकर विभाग कोणत्याही करदात्याकडून ईमेल किंवा SMS द्वारे कोणतीही माहिती विचारत नाही. जर कोणी आपला पिन, संकेतशब्द, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याची माहिती विचारत असेल तर ती देऊ नका.
असे होऊ शकते तुमचे नुकसान –
कोणताही फेक SMS लिंकसहित आला तर त्यावर क्लिक केल्यास महागात पडू शकते. कारण लिंक उघडल्यानंतर यूजरनेम, पासवर्ड और क्रेडिट कार्ड यांसारखी माहिती मागितली जाऊ शकते. त्यावेळी चुकूनही आपली माहिती शेयर केल्यास नुकसान होऊ शकते.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा