जाणून बुजून TAX चुकवत असला तर सावध व्हा ! होऊ शकते 7 वर्षांची कैद, जाणून घ्या Income Tax चा नियम

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – टॅक्स चुकवणे (Tax evasion) हा खूप मोठा गुन्हा आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, टॅक्स चुकवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा टॅक्स, दंड किंवा व्याज कमी करुन किंवा तारण ठेवून किंवा त्याच्या उत्पन्नाचा अहवाल देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला किमान 3 महिन्यांपासून 7 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागेल. जाणीवपूर्वक टॅक्स चुकवल्याबद्दल आयकर कायद्याच्या कलम 276 सी (Section 276C) अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.

25 लाख रुपयांहून अधिक टॅक्स लपवून ठेवल्यामुळे 6 महिन्यांसाठी तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते आयकर विभागाच्या कलम 266 (सी) अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने 25 लाख रुपयांहून अधिक कर लपविण्याचा प्रयत्न केला तर त्याला किमान 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर या गुन्ह्यात सर्वाधिक शिक्षा 7 वर्ष तुरूंगवासाची आहे. तथापि, कलम 266 सी (2) नुसार जर लपवलेला टॅक्स 25 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर करदात्यास किमान ३ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते, तर जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

जर आपण मुद्दाम कर लपविला असेल तरच या कलमांतर्गत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. करदात्याने खात्याशी संबंधित कोणत्याही पुस्तकात किंवा कागदपत्रात मुद्दाम उल्लेख केला नाही. या व्यतिरिक्त, आपल्याला खात्याशी संबंधित कोणत्याही पुस्तकात किंवा दस्तऐवजात चुकीची माहिती दिली तर आपल्याला जेलची हवा खावी लागेल. आपण कर लपविण्याचा प्रयत्न केला आणि हे सिद्ध झाले तर आपल्याला जेलमध्ये जावे लागेल. तथापि, आयकर विभागाच्या नियमांनुसार, कोणत्याही व्यक्तीला बोलण्याची संधी न देता दंड किंवा त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही किंवा इतर कोणतीही शिक्षा दिली जाऊ शकत नाही.