पुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या

नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाने (income tax department) पुढील महिन्यापासून जास्त दराने टीडीएस वसूल करण्यासाठी व्यवस्था विकसित केली आहे. ही व्यवस्था स्रोतावर कर कपात (TDS) आणि स्रोतावर कर संग्रह (TCS)साठी आहे. याद्वारे एक जुलैपासून जास्त दराने प्राप्तकर वसूल करण्यासाठी व्यक्तीची ओळख पटवण्यात मदत होईल. आर्थिक वर्ष 2020-21 च्या बजेटमध्ये अशाप्रकारची तरतूद करण्यात आली आहे.

income tax department functionality to identify specified persons on whom higher tds tcs would be levied from july1

विशेष म्हणजे या वर्षात बजेटमध्ये तरतूद केली आहे की, मागील दोन आर्थिक वर्षात प्राप्तीकर रिटर्न न भरणार्‍या त्या लोकांच्या बाबतीत स्रोतांवर कर कपात आणि स्रोतांवर कर संग्रह जास्त दराने असेल, ज्यांच्यावर दोन वर्षात प्रत्येकात 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर कपात होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) ने याबाबत एक सर्क्युलर जारी केले आहे.
यामध्ये प्राप्तीकर परतावा न भरणार्‍या अशा लोकांच्याबाबतीत उच्च दराने कर कपात/संग्रहाबाबत कलम 206एबी आणि 206सीसीएच्या अंमलबजावणीबाबत माहिती आहे.

प्राप्तीकर विभागाने ट्विटरद्वारे सांगितले की, कलम 206एबी आणि 206सीसीएसाठी पालन तपासणीबाबत नवीन व्यवस्था जारी करण्यात आली आहे.
यातून स्त्रोतावर कर कापणारे आणि टीसीएस संग्रहकर्त्यांसाठी अनुपालन भार कमी होईल.
सीबीडीटीचे म्हणणे आहे की, टीडीएस कापणारे किंवा टीसीएस संग्रहकर्त्या व्यक्तीच्या ओळखीबाबत यावर योग्य लक्ष द्यावे लागेल, अखेर यातून त्यांच्यावर अतिरिक्त पालन भार पडू शकतो.

नवीन व्यवस्थेंतर्गत टीडीएस अथवा टीसीएस संग्रहकर्त्यांला त्या पैसे भरणार्‍या किंवा टीसीएस थकबाकीदारचे पॅन प्रक्रियेत टाकायचे आहे ज्याद्वारे हे समजेल की तो ‘विशिष्ट व्यक्ति’ आहे किंवा नाही.

हे देखील वाचा

Amit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….

Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच

रेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : income tax department functionality to identify specified persons on whom higher tds tcs would be levied from july1

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update