Income Tax Department | कुठून आली इतकी मोठी कॅश? हिशेब न दाखवल्यास द्यावा लागू शकतो 84% टॅक्स; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडे घर-ऑफिसमध्ये जर विना हिशेबाची मोठी कॅश असेल, किंवा बँक खात्यात (Bank Account) खुप मोठी रक्कम असेल आणि तुम्ही तिचा स्त्रोत सांगू शकला नाहीत, तर इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) तुमच्याकडून यावर 84 टक्केपर्यंतचा भरभक्कम टॅक्स वसूल करू शकतो. Income Tax Department | if you have unaccounted cash or account no source disclose huge tax and penalty
बेहिशोबी कॅशबाबत इन्कम टॅक्सचे (Income Tax Department) मूल्यांकन अधिकारी शोध घेऊ शकतात किंवा अनेकदा ती व्यक्तीच याची माहिती स्वता आपल्या प्राप्तीकर रिटर्नमध्ये (income tax return) देते, ज्याच्याकडे कॅश असते.
दोन्ही स्थितीत प्राप्तीकर (income tax) कलम 115BBE च्या अंतर्गत या कॅशवर विशेष दराने टॅक्स लावला जाऊ शकतो.
जर टॅक्सपेयरच्या आयटीआरमध्ये (taxpayer ITR) असे एखादे उत्पन्न दिसत असेल.
ज्याचा कोणताही स्त्रोत सांगितलेला नसेल आणि मूल्यांकन अधिकार्याने त्यास पकडले तर प्राप्तीकर कलम 115BBE च्या तरतूदी लागू होतील.
जर तुम्ही मोठ्या रक्कमेचा व्यवहार करत असाल तर तो तुम्ही इन्कम टॅक्सच्या नजरेपासून वाचवू शकत नाही. कारण बँक, म्यूच्युअल फंड, ब्रोकर, प्रॉपर्टी रजिस्ट्रार सारख्या अनेक संस्था मोठ्या रक्कमेच्या व्यवहाराची माहिती इन्कम टॅक्स विभागाला देत असतात.
या व्यवहारांचा जर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) मध्ये दिलेल्या माहितीसोबत ताळमेळ बसत नसेल तर प्राप्तीकर विभाग नोटीस पाठवू शकतो आणि कर मूल्यांकन अधिकारी 84 टक्केपर्यंचा मोठा टॅक्स वसूल करू शकतो.
कसा लागतो टॅक्स :
प्राप्तीकर कलम 115BBE नुसार विना हिशेबाच्या रोकडवर 60 टक्केच्या दराने टॅक्स लावला जातो.
यानंतर त्यावर 25 टक्केचा सरचार्ज लागतो जो 15 टक्केच्या टॅक्सच्या बरोबर असतो.
यानंतर पुन्हा या (75 टक्के) वर 4 टक्के सेस लागतो जो सुमारे 3 टक्के टॅक्सच्या बरोबरीने आहे.
अशाप्रकारे एकुण टॅक्चा दर सुमारे 78 टक्के (60% +15%+ 3%) होतो.
याशिवाय मूल्यांकन अधिकारी 6 टक्के दंड लावू शकतो.
अशाप्रकारे एकुण टॅक्स 84 टक्के पर्यंत होतो.
Web Title : Income Tax Department | if you have unaccounted cash or account no source disclose huge tax and penalty
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bank new rules | ‘या’ 5 सरकारी बँकांचे आहात ग्राहक, तर ‘ही’ 2 कामे करणे आहे आवश्यक; जाणून घ्या कारण
Pune News | टॉय ट्रेड असोसिएशनतर्फे लहान मुलांच्या कोविड सेंटरला खेळणी भेट
Job Alert | ‘या’ कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर