Income Tax Department | इन्कम टॅक्स अलर्ट ! ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – आधार नंबरला पॅन कार्ड नंबरशी (Link Pan Card to Aadhar) लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) कठोर भूमिका घेऊ शकते. सुमारे 13 वेळा विभागाने डेडलाईन वाढवलेली असल्याने आता ज्यांनी आपला पॅन नंबर अद्याप आधारशी लिंक केलेला नाही अशा कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यासाठी कंपन्यांना (Employer) निर्देश दिले जाऊ शकतात. वरीष्ठ सूत्रांनुसार, विभागाने कंपन्यांना सर्क्युलर (circular) जारी करून आपल्या कर्मचार्‍यांचे आधार आणि पॅन लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत.

लिंकिंगसाठी आता 30 जून अखेरची तारीख आहे. लिंक न केलेले पॅन कार्ड वापरल्यास इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट अंतर्गत सेक्शन 272बीचे उल्लंघन मानले जाईल. अशा पॅन कार्डधारकाला 10000 रुपये दंड भरावा लागेल. पुन्हा अशी चूक झाल्यास दंड वाढू शकतो.

ऑनलाइन असे करा लिंक

1. अकाऊंट नसेल तर स्वताला रजिस्टर करा.

2. प्राप्तीकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) वर जा.

3. वेबसाइटवरील लिंक आधार ऑपशनवर क्लिक करा.

4. लॉगइननंतर अकाऊंटच्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जा.

5. प्रोफाइल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक ऑपशन सिलेक्ट करा.

6. येथील सेक्शनमध्ये आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.

7. यानंतर खालील लिंक आधार ऑपशनवर क्लिक करा. यानंतर आधार लिंक होईल.

हे देखील वाचा

Prithviraj Chavan । पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालविण्याचे – पृथ्वीराज चव्हाण

Earn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे

Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Income Tax Department | Income tax alert do this work quickly or your salary will stop

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update