Income Tax Department | देशातील कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा ! प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Income Tax Department | प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) एक आदेश जारी करून कर अधिकार्‍यांना प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात फायनान्स अ‍ॅक्टच्या माध्यमातून, प्राप्तीकर कायदा, 1961 च्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आणि हे ठरले की, प्राप्तीकर समझोता आयोग (ITSC) 1 फेब्रुवारी 2021 पासून काम करणे बंद करेल.

याशिवाय, ही सुद्धा तरतुद करण्यात आली की, 1 फेब्रुवारीला किंवा त्यानंतर कर प्रकरण निकाली काढण्यासाठी अर्ज दाखल करता येणार नाही.
याच तारखेला फायनान्स बिल, 2021 लोकसभेत सादर करण्यात आले होते.

31 जानेवारी 2021 पर्यंत प्रलंबित कर प्रकरणांचे मिळालेले अर्ज निकाली काढण्यासाठी सरकारने एका अंतरिम बोर्डाचे गठण केले आहे.
अर्थ मंत्रालयाला समजले आहे की, अनेक करदाते टॅक्स सेटलमेंटसाठी आयटीएससीमध्ये 1 फेब्रुवारीपर्यंतची तारीख समजून अर्ज देण्याच्या तयारीत होते.

CBDT ने जारी केला नवीन आदेश

जे करदाते 31 जानेवारी 2021 पर्यंत कर तडजोडीसाठी अर्ज देण्यास पात्र होते, परंतु आयटीएससी बंद असल्याने अर्ज जमा करू शकले नाहीत.
त्यांना सरकारकडून दिलासा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारने निर्णय घेतला आहे की, अशा करदात्यांची प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्यासाठी ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अंतरिम बोर्डमध्ये आपला अर्ज जमा करू शकतात.

यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 28 सप्टेंबरला एक आदेश जारी केला आहे.
आदेशात म्हटले आहे की, आयटी कमिश्नर प्रलंबित कर प्रकरणांचा अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत मंजूर करू शकतात.

 

कुठे द्यायचा आहे अर्ज

या कामासाठी सेटलमेंट कमीशनच्या सचिवांना अर्ज मंजूर करण्यासाठी अधिकृत केले आहे.
अंतरिम बोर्डाकडून इन्कम टॅक्स कमिश्नर 31 जानेवारी 2021 च्या नंतर दाखल अर्ज मंजूर करू शकतील. (Income Tax Department)

 

Web Title : Income Tax Department | income tax department issued an order asking taxmen to accept till september 30 applications for settlement of pending tax cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | परदेशी चलनाच्या आमिषाने तरुणाला 3 लाखांचा गंडा; केलं ‘हे’ कृत्य

Gold Scheme | खुशखबर ! फक्त 100 रूपयांमध्ये विकलं जातंय सोनं, जाणून घ्या कसं खरेदी करू शकता एवढया कमी किंमतीत Gold

IBPS Recruitment 2021 | ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1.50 लाखांपर्यत