IT Refund : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 5 जुलैपर्यंत टॅक्सपेयर्सला पाठवले 37,050 कोटी रुपये, या पद्धतीने तपासा रिफंडचे स्टेटस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने चालू आर्थिक वर्षात (2021-22) पाच जुलैपर्यंत 17.92 लाखापेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 37,050 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 5 जुलै 2021 दरम्यान जारी रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 10,408 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेटचा टॅक्स रिफंड 26,642 कोटी रुपये होता. income tax department issues refunds worth rs 37050 crore until july 5

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून म्हटले, सीबीटीडीने 1 एप्रिल 2021 पासून पाच जुलैच्या दरम्यान 17.92 लाखापेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 37,050 कोटी रुपये परत केले आहेत. यापैकी 16,89,063 प्रकरणात 10,408 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 1,03,088 प्रकरणात 26,642 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी केला गेला.

असे चेक करा रिफंडचे स्टेटस
– यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटवर जावे लागेल. येथे आपले पोर्टल लॉगिन करा. पोर्टल लॉगिनसाठी पॅन नंबर, ई-फायलिंग पासवर्ड आणि कॅप्चा भरा.
– पोर्टल प्रोफाईल उघडेल, त्यानंतर View returns/forms वर क्लिक करा.
– पुढील स्टेपमध्ये ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returns वर क्लिक करून सबमिट करा. हायपरलिंक अ‍ॅकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.
– या स्क्रीनवर फायलिंगची टाइमलाईन, प्रोसेसिंग टॅक्स रिर्टनबाबत माहिती मिळेल.
यामध्ये फायलिंगची तारीख, रिटर्न व्हेरिफाय करण्याची तारीख, प्रोसेसिंग पूर्ण होण्याची तारीख, रिफंड जारी करण्याची तारीख आणि पेमेंट रिफंडबाबत माहिती असेल.

Web Title :  income tax department issues refunds worth rs 37050 crore until july 5 

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Indian Railways | रेल्वे प्रवासाचा अचानक बदलला प्लॅन, तर तिकिट कॅन्सल न करता ‘या’ पध्दतीनं बदला प्रवासाची तारीख; जाणून घ्या