टॅक्स चोरी थांबणार ! इन्कम टॅक्स विभागाकडून ‘फॉर्म 16’ मध्ये केले मोठे बदल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इन्कम टॅक्स विभागाने टीडीएस प्रमाणपत्रात सुधारणा केली आहे म्हणजेच ‘फॉर्म 16’ मध्ये मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये घरगुती उत्पन्‍न आणि इतरांकडून मिळालेले पुरस्कार आणि बक्षिसांचा समावेश केला आहे. हे व्यापक बदल केल्यामुळे टॅक्स चोरीला आळा बसणार आहे.

विविध कर बचत योजना, कर बचत उत्पादने, कर्मचार्‍यांना मिळाणारे विविध भत्‍ते आणि इतर उत्पन्‍नाचा देखील आता ‘फॉर्म 16’ मध्ये समावेश केला जाणार आहे. ‘फॉर्म 16’ हे एक असे प्रमाणपत्र आहे की ज्यामध्ये उत्पन्‍नावरील कराचे विवरण दिले जाते. जून महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास हा फार्म भरला जातो. ‘फार्म 16’ चा उपयोग इन्कम टॅक्स भरण्यासाठी केला जातो. इन्कम टॅक्स विभागाकडून बदललेला हा फॉर्म दि. 12 मे 2019 रोजी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स रिटर्न हे बदललेल्या ‘फॉर्म 16’ च्या आधारेच भरले जातील. इतर गोष्टी व्यतिरिक्‍त बदललेल्या ‘फॉर्म 16’ मध्ये बचत खात्यावर जमा झालेल्या व्याजासंदर्भातील कपातीचा आणि सुट मिळालेल्या तपशीलाचा समावेश असणार आहे. इन्कम टॅक्स विभागाने यापुर्वीच आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी केले आहेत.

पगारदार वर्ग आणि जे लोक त्यांच्या खात्याचे ऑडिट करतीत नाहीत त्यांना यंदा दि. 31 जुलैपर्यंत आयटीआर भरणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, इन्कम टॅक्स विभागाने ‘फॉर्म 24 क्यू’ मध्ये देखील थोडी सुधारणा केली आहे. कर चोरी होवु नये म्हणुनच ‘फॉर्म 16’ आणि ‘फॉर्म 24 क्यू’ मध्ये बदल करण्यात आले आहेत.