Income Tax विभाग आज लाँच करणार नवीन वेबसाइट, टॅक्सपेयर्सला मिळतील ‘या’ सुविधा; जाणून घ्या

नवी दिल्ली : प्राप्तीकर विभाग टॅक्सपेयर्सच्या सुविधांसाठी सोमवार म्हणजे आजपासून आपले नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच करत आहे. आता इन्कम टॅक्स Income Tax रिटर्न आयटीआर दाखल करण्यासह इतर सर्व आवश्यक कामे विभागाच्या नवीन पोर्टल www.incometax.gov.in वर संचालित होतील. यामध्ये अनेक फिचर्स असतील, ज्यामध्ये काम वेगाने केले जाईल, यातून इन्कम टॅक्स Income Tax रिटर्नची तात्काळ प्रोसेसिंग सुरू होईल आणि रिफंडची प्रक्रिया सुद्धा वेगाने होईल.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चा हेतू नवीन ई-फायलिंग पोर्टलद्वारे

करदात्यांना सुविधा प्रदान करून देणे, एक आधुनिक आणि विना अडथळा सेवा देणे आहे.

काय म्हटले आयकर विभागाने

प्राप्तीकर विभागाने म्हटले की, इन्कम टॅक्स भरण्याची नवीन व्यवस्था 18 जूनला लाँच केली जाईल,

अ‍ॅडव्हान्स टॅक्स इन्स्टॉलमेंटच्या डेटनंतर जेणेकरू टॅक्सपेयर्सला कोणतीही असुविधा होऊ नये.

काय आहे नवीन पोर्टलची पाच वैशिष्ट्य

1. सर्व प्रकारचे इंटरॅक्शन आणि अपलोड किंवा प्रलंबित कार्यवाही प्रदर्शित होईल.

ज्याद्वारे टॅक्सपेयर्स सर्व गोष्टी ट्रॅक करू शकतील.

2. टॅक्सपेयर्सला आयटीआर दाखल करण्यासाठी आयटीआर 1, 4 (ऑनलाइन आणि ऑफलाइन) तसचे आयटीआर 2 (ऑफलाइन)

दाखल करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह प्रश्नांसह आयटीआर प्रीपरेशन सॉफ्टवेयर उपलब्ध होईल.

तर आयटीआर 3, 5, 6, 7 तयारची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाईल.

3. करदात्याचे वेतन, गृह संपत्ती, व्यवसाय किंवा प्रोफेशनसह उत्पन्नाची माहिती प्रदान करण्यासाठी आपली प्रोफाइल सक्रिय प्रकारे अपडेट करू शकता.

याचा उपयोग आयटीआर भरण्यासाठी केला जाईल. टीडीएस आणि एसएफटी माहिती अपलोड झाल्यानंतर वेतन उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली लाभासह अगाऊ पैसे भरण्याची व्यापक क्षमता उपलब्ध होईल.

4. करदात्यांच्या प्रश्नांना ताबडतोब उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर सुद्धा सुरू केले जाईल. पोर्टलवर करदात्यांकडून नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे, वापरकर्ता नियामवली, व्हिडिओ सारख्या सुविधा उपलब्ध होतील.

करदात्यांना त्या वापरण्यासाठी किंवा कोणती इतर त्रास झाल्यास चॅटबोट आणि लाईव्ह एजंटशी संवाद साधण्याची सुविधा सुद्धा मिळेल.

5. नवीन पोर्टलद्वारे टॅक्सपेयर्स इन्कम टॅक्स फॉर्म भरणे, टॅक्स प्रोफेशनल्सला जोडणे, फेसलेस स्क्रूटनी किंवा अपीलमध्ये नोटीला उत्तर सबमिट करणे, इत्यादी लाभ घेऊ शकतात.

Also Read This : 

 

यकृताचा आकार वाढणं म्हणजे काय ?

 

लस घेण्यासाठी कोणती चांगली वेळ ‘सकाळ’ की ‘रात्र’?