बेनामी संपत्‍ती ओळखण्यासाठी ‘इन्कम टॅक्स’ विभाग २४ ठिकाणी ‘सक्रिय’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने काळ्या पैशापासून ते बेनामी संपत्तीपर्यंत सर्वावरच नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आयकर विभागाने बेनामी संपत्ती ओळखण्यासाठी देशभरात आपली सक्रियता वाढवली आहे. यासाठी आयकर विभागाने २४ शहरात बेनामी प्रोबेशन यूनिटची (बी पीयू) स्थापना केली आहे.

यात अनेक मेट्रो शहरांचा समावेश आहे. बी पीयू ने मोठ्या प्रमाणात बेकायदा संपत्ती असलेल्यांना शोधून काढले असून लवकरच त्यांना नोटीसा पाठवण्यात येणार आहे. २४ युनिटमध्ये तैनात कर आधिकारी प्राप्त सूचनांच्या आधारे बेनामी संपत्ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

आयकर विभागाच्या मते, बेनामी ट्रांजेक्शन संशोधन कायदा २०१६ मध्ये लागू करण्यात आल्यानंतर २१०० बेनामी संपत्तीधारकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या संपत्तीची किंमत ९६०० कोटी रुपये ऐवढी आहे.

बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार नाही –
जर कोणताही व्यक्ती बेनामी संपत्तीची माहिती दिल्यास त्या माहितीच्या आधारे कारवाई करु विभाग संपत्ती ताब्यात घेते. तर माहिती देणाऱ्याला १ कोटी रुपयांच्या पुरस्कार देण्यात येईल. ही माहिती देणाऱ्यांची नावे कोणालाही सांगण्यात येणार नाही. ऐवढेच नाही तर आयकर विभागाने हे सांगण्यात देखील नकार दिला आहे की आता पर्यंत कोणी कोणी बेनामी संपत्तीची माहिती दिली आहे आणि कोणाकोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे.

७ वर्षाची शिक्षा –
बेनामी संपत्ती आणि देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बेनामी देवाणघेवाण कायद्यात २०१६ साली संशोधन केले आहे. या संशोधनात बेनामी संपत्तीला सील करणे आणि संपत्ती जप्त करण्याचा आधिकार दिला आहे. या कायद्यानुसार बेनामी संपत्ती मिळाल्यास ३ वर्षांची शिक्षा वाढवून ७ वर्ष करण्यात आली आहे. तसेच बेनामी संपत्तीच्या बाजार मूल्यानुसार २५ टक्के दंडांची तरतूद करण्यात आली आहे.

चूकीची महिती दिल्यास तुरुंगवास –
आयकर विभागाने सांगितले आहे की, चूकीची माहिती देऊ नका, जर कोणीही चूकीची महिती दिली तर तुम्हाला कायद्यानुसार ५ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि बेकायदा संपत्ती बाजार मूल्याच्या १० टक्के दंड भरावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

पावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी

अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी