Income Tax विभागाकडून ईमेल, SMS आलाय ? असं तपासा Email आणि ‘संदेश’ अन्यथा होईल मोठं ‘नुकसान’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला आयकर विभागाकडून एखादा इ मेल किंवा मेसेज आला असेल तर कितपत खरा किंवा खोटा आहे याची पडताळणी करणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारची माहिती कशी तपासावी या संबंधीचा एक इमेल आणि मेसेज आयकर विभागाने सर्व आयकर भरणाऱ्या ग्राहकांना केला आहे. ज्यामध्ये आयकर विभागाने आपले अधिकृत इमेल आयडी, मेसेज सेंटर तसेच अधिकृत वेबसाईटचा देखील उल्लेख केलेला आहे.

तसेच देण्यात आलेल्या यादी व्यतिरिक्त इतर कोणत्याही आयडीवरून आयकर विभागासंबंधितचा मेल आल्यास तो न उघडण्याचा सल्ला आयकर विभागाकडून देण्यात आला आहे. विभागाकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये म्हंटले आहे की, क्लिक करण्यापूर्वी नेहमीच तपासा. केवळ या स्रोतांवर विश्वास ठेवा. करदात्यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून काही लोकांकडून संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर आयकर विभागाने ही यादी जाहीर केली आहे.

आयकर विभागाच्या अधिकृत ईमेल आयडी पुढीलप्रमाणे आहेत
@incometax.gov.in, @incometaxindiaefiling.gov.in, @tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @insight.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com.

या मेल आयडीवरून आलेल्या प्रश्नांचीच उत्तरे केवळ करदात्यांनी द्यावीत.

आयकर विभागाकडून मेसेज पाठवण्यात येणारे सेंडर आयडी पुढीलप्रमाणे आहेत
ITDEPT, ITDEFL, TDSCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN

आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट www.incometaxindia.gov.in ही आहे. त्यातच टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी विभागाची अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in ही आहे.

या व्यतिरिक्त TDS संबंधातील माहितीसाठी www.tdscpc.gov.in यावर संपर्क करा. याव्यतिरिक्त रिपोर्टींगसाठी तुम्ही www.insight.gov.in यावर लॉगिन करू शकता. तसेच पॅनकार्ड संबंधित सेवांसाठी www.nsdl.co.in आणि www.utiitsl.com वर लॉगिन करा.

आयकर विभागाने सांगितले की, जर तुम्हाला इतर कोणत्याही आयडी वरून मेल आला तर तुम्ही तो मेल [email protected] आणि [email protected] यावर पाठवू शकता.