‘कल्की भगवान’ यांच्यावर ‘इन्कम टॅक्स’ची ‘रेड’, 25 हजारांमध्ये मिळत होतं ‘विशेष दर्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वतःला ‘कल्की भगवान’ म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू याच्या आश्रमावर आयकर विभागाने छापा मारला आहे. कल्की भगवान आणि त्याचा मुलगा कृष्णा यांचे अनेक राज्यांमध्ये असलेले आश्रम सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांचे आश्रम आहेत.
Kalki Bhagwan
एकूण चाळीस ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे. ज्यामध्ये त्याच्या नावावर बनवलेली युनिव्हर्सिटी आणि शाळेचा समावेश आहे. त्याचा मुख्य आश्रम आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्याच्या वैरादेहपलेममध्ये आहे. मुख्य आश्रमाला चारही बाजूने कव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे आतले कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचे कोणी आत येऊ शकत नाही. जमिनी हडपणे आणि कराची चोरी करणे असे अनेक आरोप नायडू याच्यावर करण्यात आलेले आहेत. तसेच आयकर विभागाने कल्की आश्रमाच्या मॅनेजरची देखील चौकशी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विजय नायडू उर्फ कल्की भगवान एलआयसीमध्ये क्लर्कची नोकरी करत होता. त्यानंतर त्याने शिक्षण संस्था सुरु केली मात्र संस्थेचे दिवाळे निघाले त्यानंतर नायडू गायब झाला आणि 1989 मध्ये पुन्हा चित्तूर येथे आला आणि स्वतःला विष्णूचा दहावा अवतार ‘कल्की भगवान’ सांगू लागला.
Ashram
आंध्र प्रदेशासोबतच त्यांनी आपल्या आश्रमांचे जाळे इतर राज्यांमध्ये देखील वाढवले. या आश्रमांमध्ये मोठं मोठे धनिक लोक आणि विदेशी नागरिक देखील येत असे. कल्की भगवान यांचे दर्शन करण्यासाठी पाच हजार रुपये आणि विशेष दर्शन घेण्यासाठी पंचवीस हजार रुपये द्यावे लागत असे. 2010 मध्ये न्यायालयाने कृष्णा यांच्यावर जमिनी हडपल्या प्रकरणी तपासाच्या आदेश दिले होते. 2008 मध्ये चित्तूर जिल्ह्यातील आश्रमात झालेल्या गोंधळामुळे पाच लोकांच्या मृत्यू सोबत अनेक लोक जखमी झाले होते यामुळे अनेक दिवस आश्रम बंद होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी