आयकर विभागानं टाकला छापा, अधिकार्‍यांना सापडलं ‘घबाड’

पोलीसनामा ऑनलाईन  : 1)दिल्लीतील आयकर विभागाने ( Income Tax ) देशभरातील विविध ठिकाणी छापा ( Raid) मारला आहे. दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथील तब्बल 42 ठिकाणी छापा मारला. आयकर विभागाने या धाडीत मोठं घबाड हस्तगत केलं आहे.

२) आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात 2.37 रुपये रोकड आणि 2.89 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे.

३)एंट्री ऑपरेटर संजय जैन ( Sanjay Jain) आणि त्याच्या लाभार्थींच्या एकूण 42 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामध्ये मोठा माल मिळून आला आहे.

४)आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हे धाडसत्र सुरूच असून मोठ्या प्रमाणात पैसे आणि ज्वेलरी ताब्यात घेण्यात आली आहे.

५) या धाडीमध्ये तब्बल 42 ठिकाणांवर ही धाड टाकण्यात आली असून काहींना चौकशीसाठी ( Inquiry) ताब्यात घेण्यात आलं आहे.

६)हैदराबादमध्ये यापूर्वी आयकर विभागाने मोठी धाड टाकली होती, त्यावेळी एका महसूल अधिकाऱ्याकडून मोठी संपत्ती जप्त करण्यात आली होती

७)आयकर विभागाने खोट्या बिलाच्या आधारे रोकड जमा करणाऱ्या रॅकेटचा देखील पर्दाफाश केला होता.

८)या कारवाईमध्ये आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.

९)आयकर विभागाकडून या संदर्भात अद्यापही छापेमारी आणि तपास सुरु असून आणखी काही घबाड हाती लागण्याची देखील शक्यता आहे.