मोठा दिलासा ! इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टचा IT रिटर्नच्या नियमातील बदलांचा ‘निर्यण’ मागे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टने तीन दिवसांच्या आतच आपला निर्णय मागे घेत टॅक्स रिटर्न फाइलशी संबंधीत नियमांमध्ये बदल केले आहेत. आयटीआरच्या नव्या फॉर्ममध्ये घराच्या सहमालकाला दुसरा फॉर्म भरावा लागणार होता. परंतु, आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने लोकांच्या असंख्य तक्रारी आणि अडचणी जाणून घेवून निर्णय मागे घेतला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर जॉईंट आनेरशिपमध्ये जर सिंगल प्रॉपर्टी असेल तरी सुद्धा तुम्ही आयटीआर 1 आणि आयटीआर 4 द्वारे रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय आता 1 लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरणार्‍यांना सुद्धा आयटीआर 1 आणि आयटीआर 4 भरता येईल. परदेश दौर्‍यावर 2 लाखांपेक्षा जास्त खर्च करणारे सुद्धा आयटीआर 1 आणि आयटीआर 4 भरू शकतात. सरकारने सर्व बदल मागे घेतले आहेत. केंद्र सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये काही दिवसांपूर्वी बदल केल्याचे जाहीर केले होते.

आयटीआर-1 साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी करण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2019-20 च्या आयटीआर-1 फॉर्ममध्ये मोठा बदल करण्यात आला होता. टॅक्स डिपार्टमेंटने आपल्या पहिल्या आदेशात म्हटले होते की, आयटीआर-1 फार्म ते लोक भरू शकणार नाहीत ज्यांच्याजवळ घराचे संयुक्त मालकी हक्क आहेत. मागच्या वर्षी संयुक्त मालकी हक्क असणारे लोक आयटीआर-1 फॉर्म भरू शकत होते.

टॅक्स डिपार्टमेन्टने यापूर्वीच केले आहेत बदल

(1) पासपोर्ट डीटेल्स
यावर्षी आयटीआर-1 फॉर्ममध्ये पासपोर्ट नंबर (जर करदात्याकडे असल्यास) सुद्धा नोंदवावा लागेल. फॉर्ममध्ये हा नवा नियम जोडण्यात आला आहे. ज्यांनी परदेश दौर्‍यावर 2 लाख अथवा त्यापैक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत ते आयटीआर-1 फॉर्म भरू शकत नाहीत.

(2) कंपनीचा टॅन नंबर
आता आयटीआर-1 फॉर्ममध्ये तुमच्याकडून नियुक्तीकर्त्याची सविस्तर माहिती मागितली जाईल. परंतु, मागील वर्षी आयटीआर-1 मध्ये ड्रॉप डाऊन मेन्यूमधून केवळ नेचर ऑफ एम्ल्पॉयमेंटसारखे गव्हर्मेंट, पीएसयू, पेंशनर्स, आदी पर्याय निवडावे लागत होते.

जर तुमचा नियुक्ती टॅक्स (टीडीएस) कापला जात असेल तर यावर्षीपासून आयटीआर-1 भरताना तुम्हाला टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर देणे बंधनकारक असणार आहे. अन्य तपशीलात नाव, नेचर ऑफ एम्ल्पॉयमेन्ट तसेच एम्ल्पॉयरचा पत्ता द्यावा लागेल.

(3) भाडेकरूचा पॅन किंवा आधार नंबर
जर तुम्ही तुमची संपत्ती कुणाला भाडेकरारावर दिली असेल तर तुम्हाला भाडेकरूचा पॅन किंवा अधार नंबर उपलब्ध असल्यास द्यावा लागेल.

(4) घराचा पूर्ण पत्ता
आता आयटीआर-1 फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या घराचा पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे.

(5) अनरियलाईझ रेन्टचे डीटेल्स
अनरियलाईझज्ड रेन्ट म्हणजे हाऊसिंग प्रॉपर्टीद्वारे मिळणार्‍या रक्कमेचे डीटेल्स भरावे लागणार आहेत, जे काही कारणामुळे घर मालकांना मिळाले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/