कारच्या स्पेअर टायरमधून २ कोटी ३० लाख जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर रोकड पकडण्यात येत आहे. आयकर विभागाच्या पथकाने कर्नाटकातून आज एका कारच्या स्पेअर टायरमधून नेली जाणारी तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर गोव्यातही मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केली आहे.

देशात निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या रकमेच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर देशात रोकड जप्त केली जात आहे. दरम्यान आज आयकर विभागाने कर्नाटकात एकाला मोठ्या रोकडेसह ताब्यात घेतले आहे. बंगळूरू येथून शिवमोगा येथे जाणाऱ्या कारमधून २ कोटी ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम कारच्या एका स्पेअर टायरमध्ये सापडली आहे. दोन हजारांच्या नोटा या स्पेअर टायरमध्ये लपवून नेल्या जात होत्या.

त्यासोबतच आयकर विभागाने गोव्यातही मोठ्या प्रमाणावर रोक़ड जप्त केली आहे. दोन्ही ठिकाणची रक्कम मिळून ४ कोटींपेक्षा जास्त आहे.