कामाची गोष्ट ! Income Tax डिपार्टमेंट आणतंय नवीन ITR फॉर्म, करदात्यांचा होणार मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस संसर्गामुळे देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारने आयकर रिटर्न भरणाऱ्यांना दिलासा देत ITR साठी जूनपर्यंत मुदत दिली आहे, परंतु कर भरणाऱ्यांनी त्यासाठी तयारी ठेवावी. Incoem Tax विभागही अशीच काही तयारी करत असून प्राप्तिकर विभागाने आपल्या करदात्यांना दिलासा देण्यासाठी New ITR Form जारी करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आयटीआर भरणाऱ्यांना मोठा फायदा होईल.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ने ट्विट करत याची घोषणा केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये CBDT ने म्हटले आहे की, ते एक नवीन ITR फॉर्म आणणार आहेत, ज्याचा फायदा करदात्यांना होईल. CBDT ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘CBDT आयकर रिटर्न फॉर्म मध्ये आवश्यक ते बदल करत आहे, जेणेकरून कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्राप्तिकर भरण्यास वाढीव मुदतीचा लाभ मिळू शकेल.

या ट्विटमध्ये एक प्रेस रिलीज देखील शेअर केली आहे, ज्यात म्हटले गेले आहे की, फॉर्म मध्ये बदलानंतर करदाते आर्थिक वर्ष २०१९-२० च्या रिटर्न फॉर्म मध्ये १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० पर्यंतच्या कालावधी दरम्यान केलेल्या व्यवहारांचा फायदा घेऊ शकतात. CBDT ने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी रिटर्न फॉर्म मध्ये संशोधन केले आहे.

प्राप्तिकर विभाग शक्यतो या महिन्याच्या अखेरीस हा फॉर्म जारी करू शकते, त्यानंतर आयकर रिटर्न दाखल करताना ते आपल्या सर्व खर्चाची माहिती देण्यास सक्षम असेल.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च ते ३० जून २०२० पर्यंत वाढवली आहे. तसेच उशिरा फाइन भरल्यावर १२ ऐवजी केवळ ९ टक्के व्याज दिले जाईल, असेही ते म्हणाले.