शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या उद्योग समुहावर Income Tax चा छापा, 100 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त

बंगळुरू : वृत्तसंस्था – शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या एका उद्योग समुहावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये मोठं घबाड हाती लागले आहे. हा उद्योग समुह कर्नाटकामध्ये काही शैक्षणिक संस्था चालवतेय. यामध्ये अनेक इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसचा समावेश आहे. या छाप्यात आयकर विभागाने तब्बल 100 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळून आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. अधिकारी या संपत्तीची मोजदाद करत असून रोख पैसे, सोने आणि अनेक गोष्टी मिळाल्याचे विभागाने म्हटले आहे.

आयकर विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले होते. या उद्योग समुहाकडून ज्या शिक्षण संस्था चालवल्या जातात त्यामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जागेसाठी 50 ते 65 लाख रुपयांचे डोनेशन घेऊन जागा भरल्या जात होत्या. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

डोनेशनच्या माध्यमातून ही संपत्ती गोळा करण्यात आली होती. या शैक्षणिक संस्थांच्या मुख्य विश्वस्तांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांमध्येही मोठी संपत्ती सापडली आहे. ही सर्व संपत्ती बेहिशोबी असून यामध्ये 89 लाख रुपयांची रोकड त्यांच्या घरात सापडली आहे. तसेच त्यांच्याकडे 4 कोटी 22 लाखांची रोख रक्कम सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या छाप्यांमुळे राज्यात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलंय. या छाप्याशी राजकीय संबंधांनाही जोडलं जात असून एवढी संपत्ती कशी जमा होऊ शकते असा प्रश्नही आता विचारला जातोय.

Visit : Policenama.com