ITR Filing : स्वतःच माहिती करून घ्या किती द्यावा लागणार ‘टॅक्स’, जाणून घ्या कसा कराल हिशोब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    फाइल संबंधित सर्व दस्ताऐवज एकत्र केल्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे टॅक्स कपात वाचवण्यासाठी एकूण उत्पनाची माहिती घेणे असते. इनकम टॅक्सच्या नियमानुसार, ग्रॉस सॅलरी पाच भागामध्ये विभागली जाते. यामध्ये सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेसमधून मिळालेले उत्पन्न, प्रोफेशन आणि अन्य साधनांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश असतो. उत्पनाचे साधन ओळखताना तुम्हाला आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर भरावा लागतो. आपल्या 2019-20 आर्थिक वर्षाच्या गणनेसाठी येथे काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहे.

हेड सॅलरीअंतर्गत उत्पन्न

यामध्ये तुम्हाला वर्षभराच्या उत्पनाबद्दल कंपनीकडून मिळालेल्या फॉर्म 16 द्वारे माहिती मिळते की, तुमच्या टॅक्समध्ये कपात केली आहे की नाही. यामध्ये तुमच्या सॅलरीवर किती टक्के टॅक्स लागतो याबद्दल देखील सांगितले गेले आहे आणि टॅक्स किती कट झाला हे देखील माहित होते. टॅक्समध्यम सूट मिळण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक दस्ताऐवज जमा करावे लागतात. हाऊस रेंट, स्टॅडर्ड डीडक्शन, लीव्ह किंवा प्रवास भत्ता यावर टॅक्स सूट मिळते. हाऊस रेंट एका वर्षात एक लाखापेक्षा वर जाते. तर टॅक्स बचतीसाठी आपल्याला घरमालकाचे पॅन कार्ड ऑफिसमध्ये द्यावे लागते. 50,000 रुपयाच्या स्टॅंडर्ड डिडक्शनसाठी कोणत्याही दस्तऐवजची गरज नसते. जर तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून फॉर्म 16 मिळाला नाही तर टॅक्स कपातीबद्दल सॅलरी स्लिपमधून तुम्हाला याची माहिती मिळू शकते.

हाऊस प्रॉपर्टीमधून उत्पन्न

जर तुम्ही तुमचे घर भाड्याने दिले असेल तर त्याचे उत्पन्न या अंतर्गत दाखवले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीकडे घर आहे ज्यामध्ये तो स्वतः राहत आहे तर उत्पन्न शुन्य असेल. याव्यतिरिक्त एखाद्या घराचे लोन चालू असेल तर त्याच्या व्याजाबरोबर 2 लाखापर्यंत कपातीसाठी क्लेम केला जाऊ शकतो. दोन किंवा तीन घरात स्वतः राहत असाल तर त्यांना टॅक्स नाही लागणार. ही व्यवस्था 2019-20 आर्थिक वर्षात लागू झाली आहे.

हाऊस प्रॉपर्टीवर टॅक्स गणना अशी होते.

1. अपेक्षित भाडे आणि नगरपालिकेच्या मूल्यांकनाची तुलना करा. दोघांचे उच्च मूल्य घ्या. याला अपेक्षित भाडे म्हटले गेले आहे.

2. वास्तविक भाड्याचे अपेक्षित मूल्याशी तुलना करा आणि यामध्ये जो उच्च असेल त्यांना वार्षिक ग्रोस व्हॅल्यू मानले जाईल.

3. ग्रॉस वार्षिक व्हॅल्यूदरम्यान नगरपालिका करात कपात करुन शुद्ध वार्षिक मूल्याची गणना करा.

4. वार्षिक मूल्यातून तीस टक्के घराच्या देखभाल करण्यासाठी कट करा आणि त्यामध्ये कागद दाखविण्याची गरज नसते. जर तुम्ही कर्जात व्याज दिले असेल तर ते कट करुन टाका. यानंतर जी रक्कम येते ती प्रॉपर्टीमधून मिळणारे उत्पन्न असते. जी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकते.

व्यवसायाच्या नफ्यातून मिळालेले उत्पन्न

संपत्ती जसे की, घरे, म्युच्युअल फंड इत्यादीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर असतो, यामध्ये असे देखील पाहिले जाते की, त्या व्यक्तीने किती दिवसापर्यंत या संपत्तीला विकले आहे. अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीसाठी दोन प्रकारचे भांडवली नफा असतो. जर इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि इक्विटी समभाग एका वर्षाहून अधिक काळासाठी ठेवण्यात आले असतील तर ते एलटीसीजी अंतर्गत येतात, निर्देशांकाशिवाय यामध्ये 10 टक्के टॅक्स कट करतात. जर एका वर्षापूर्वी विक्री केली गेली तर एसटीसीजी अंतर्गत 15 टक्के कपात केली जाईल. म्युच्युअल फंड कर इक्विटी फंडापेक्षा वेगळा असतो.

प्रॉपर्टी उत्पन्न

जर एखादे घर खरेदी केल्यानंतर दोन वर्षानंतर विकले गेले तर ते एलटीसीजी अंतर्गत येईल. लाभाचे मूल्यांकन केल्यानंतर 20.8 टक्के टॅक्स कट होईल. दोन वर्षाच्या आधी विकल्यास एसटीसीजी आकारले जाईल आणि टॅक्स स्लॅबनुसार कट केले जाईल.

बिझनेस आणि प्रोफेशन उत्पन्न

वकील किंवा अन्य प्रकारच्या प्रोफेशनल व्यक्तींना आपला नफा दाखविणे गरजेचे असते. याशिवाय शेअर बाजाराचे व्यवहारही दाखवावे लागतात. यामध्ये कॅश सिस्टम आणि एक्रुअल सिस्टममध्ये देखील टॅक्सचे काउंट होते. टॅक्स सिस्टममध्ये खर्च कधी झाला व कधी नफा मिळाला इत्यादी येते. ते एक्रुअल सिस्टममध्ये ड्यू होतात.

अन्य उत्पन्नाचे साधन

वरच्या चार साधनांमध्ये दिसले नसलेले उत्पन्न यामध्ये येते. बचत खात्यातून व्याज, मुदत ठेव, फिक्स्ड डिपोझिट, डिवायडेड इनकम इ. या अंतर्गत येतात.