Income Tax | पेन्शनचे उत्पन्न असलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागणार नाही ITR, फॉर्म नोटिफाईड

नवी दिल्ली : Income Tax | इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने 75 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याच्या सवलतीसाठी डिक्लरेशन फॉर्म नोटिफाईड करण्यात आला आहे. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये जमा करावा लागेल.

 

ज्येष्ठांना भरावा लागणार नाही IT रिटर्न

आर्थिक 2021-22 च्या अर्थसंकल्पात पेन्शन इन्कम आणि त्याच बँकेत एफडीवर व्याज घेणार्‍या 75 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स रिटर्न दाखल करण्यात सूट देण्याची तरतूद दाखल केली होती. या ज्येष्ठ नागरिकांना एक एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.

CBDT ने अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी नियम आणि घोषणा फॉर्म अधिसूचित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म बँकेत जमा करावा लागेल, जे पेन्शन आणि व्याज उत्पन्नावर कर कापून तो सरकारकडे जमा करतील. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची सूट त्याच प्रकरणात मिळेल ज्यामध्ये व्याज उत्पन्न त्याच बँकेतून प्राप्त होते जिथे पेन्शन जमा होते.

 

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल न केल्यास दंड

इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त इन्कम असलेल्या सर्व लोकांना रिटर्न दाखल करावा लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्ष आणि त्यावरील) आणि अत्यत ज्येष्ठांसाठी (80 वर्ष आणि त्यावरील) ही मर्यादा थोडी जास्त आहे.
इन्कम टॅक्स दाखल न केल्यास दंड लागतो आणि सोबतच संबंधित व्यक्तीला जास्त टीडीएस (TDS) द्यावा लागतो.

Web Title : Income Tax | forms for exemption from income tax returns for senior citizens notified details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Geliose Hope | 20 पैसे प्रति किमी खर्चात धावते ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर, 5 हजार रु. डाऊनपेमेंट करून घरी घेऊन या

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणार्‍या करूणा शर्मांना ‘या’ कारणामुळं अटक

Honda Dream Yuga | 86 kmpl मायलेजची ही बाईक खरेदी करा 29 हजारात, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी