खुशखबर ! करदात्यांना दिलासा, सरकार देऊ शकतं ‘इनकम टॅक्स’मध्ये मोठी सुट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉर्पोरेट कर कमी केल्यानंतर आता सरकार इनकम टॅक्स (आयकर) कमी करण्याची तयारी करत आहे. याविषयी अर्थ मंत्रालयात चर्चा सुरू आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार आयकर संबंधित धोरणांचा निर्णय घेणाऱ्या सीबीडीटी (CBDT)  विभागात याबाबत बैठक घेण्यात आली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

टास्क फोर्सने मागील महिन्यात थेट करात बदल करण्याबाबत शिफारस केली होती आणि त्या शिफारसीच्या आधारे, आयकरात कोणत्या मार्गाने बदल केला पाहिजे या बदलाचा आढावा घेण्यात येत आहे.

छोट्या, मध्यम करदात्यांना दिलासा देण्यावर भर
लघु आणि मध्यम करदात्यांना दिलासा देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. यामुळे त्यांच्या खिशात अधिक पैसे येतील आणि ज्यादा पैसे आल्याने मागणी वाढेल.

5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर वार्षिक कर आकारला जाणार नाही !
5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लावू नये ही यातील सर्वात महत्वाची शिफारस आहे. सध्या 2.50 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जातो. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त तसेच 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आणि दहा लाख ते 20 लाख रुपये 20 टक्के कर आणि 20 लाख ते 2 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर 30% टक्के कर घ्यावा.

नवीन आयकर दर 35 टक्के आणण्याची शिफारस
जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2 कोटींपेक्षा जास्त असेल तर 35 टक्के कर आकरावा . तसेच अधिभार (सरचार्ज) काढून टाकण्याची शिफारस केली गेली आहे. या शिफारशी अमलात आणताना राज्यांच्या तिजोरीचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच करदात्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Visit : policenama.com