कोल्हापूर : ‘रेड’ न टाकण्यासाठी डॉक्टरकडून 10 लाखाची लाच घेणारा इन्कम टॅक्सचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – छापा न टाकण्यासाठी एका डॉक्टरकडून तब्बल 10 लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना प्राप्तिकर विभागाच्या निरीक्षकास (Income Tax Inspector) रंगेहाथ पकडण्यात आले. कोल्हापूर (kholhapur) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी लक्ष्मीपुरा परिसरातील विल्सन पुलावर करण्यात केली. लाचखोर प्राप्तिकर निरीक्षकाला करवीर तालुक्यातील एका डॉक्टरकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रताप महादेव चव्हाण (रा. सी बोर्ड, कोल्हापूर) असे लाच घेणाऱ्या प्राप्तिकर निरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या डॉक्टर विरोधात एक अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तिकर विभाकडून संबंधित डॉक्टरची चौकशी सुरु होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा प्राताप चव्हाण याने दिला होता. घरावर छापा न टाकण्यासाठी दहा लखाची लाच मागितली होती.

प्रताप चव्हाण याने संबंधित डॉक्टरला घरावर छापा न टाकण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली होती.

अखेर तडजोडीमध्ये 14 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मध्यरात्रीपासून तडजोड सुरु होती. याच दरम्यान डॉक्टरेन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. ठरलेल्या रक्कमेपैकी दहा लाख रुपये आज देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्विकारताना चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुपचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्रताप चव्हाण याला अटक केली. त्याला कार्यालयात आणले असता त्याला भोवळ आली.